थींक पॉझिटिव्ह:सकारात्मक विचाराच्या उर्जेने आणि वेळेत उपचाराने केली आम्ही कोरोनावर मात

कोरोनावर मात करुन आपले दैनंदिन आयुष्य सुरळीत आणि आनंदी व आरोग्यदायी जगण्याचा अनुभव थींक पॉझिटिव्ह या सदरामधून घेतला जाणार  आहे. आजघडीला जगभरात कोरोना आजाराबरोबरच व्यक्तीच्या मनात थोडसे भितीचं वातावरण निर्माण झालेले आहे.  माणसाच्या मूळ भावना यात भय, चिंता, राग, द्वेष, प्रेम, आसूया ह्या आहेतच. आपण आपल्या प्रवृत्तीत ज्या भावनांना जास्त महत्व देतो. त्या – त्या वेळी प्रबळ होत जातात.  सध्या यातच कोरोना आजाराने थोडस भितीदायक वातवरण निर्माण झाल्याने आपण यावर सकारात्मक विचाराने  काही प्रमाणात नियंत्रण   मिळवू शकतो. ज्यांनी कोरोना आजार अनुभवला, यावर मात केली आणि आज आपलं दैनंदिन जीवन जगत आहेत.त्यांचे स्वअनुभव त्यांच्यात शब्दात मांडण्याचा हा  प्रयत्न, यामध्ये  ज्यांनी ह्या आजारातून आपल्या प्रबळ इच्छाशक्ती, योग्य उपचार, वेळेत निदान, लसीकरण आणि न भिता- घाबरता  सकारात्मक विचाराने मात केली. हे करताना कोणत्या बाबीला महत्व दिले हे अनुभव शब्दांकित करण्याचा हा प्रयत्न.

1.      डॉ.अनंत गव्हाणे, अपर जिल्हाधिकारी, औरंगाबाद 

लसीकरण हे आपले सुरक्षा कवच. कोरोना या आजारातून बरे होण्यासाठी मला माझं लसीकरण झाल्यामुळे लवकर बरे होण्यास मदत झाली. सर्वांचे सहकार्य यात आरोग्य यंत्रणा, मा.जिल्हाधिकारी यांचे सहकार्य, मित्र परिवार, नातेवाईक यांच्या शुभेच्छा यामुळे मी बरा झालो,  मी माझा मुलगा मिहिर प्रथम कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर घरातील सर्वांची कोरोना चाचणी करुन स्वत: गृहविलगीकरण करुन घेतले. यामुळे घरातील इतर सदस्यांना यापासून संसर्ग पासून वाचवण्यात  मला यश आल. या 15 दिवसांच्या कालावधीत आहार, योग्य औषधोपचार आणि सर्व सूचनांचे पालन केल्याने वेळेत किंवा वेळेच्या आधीच मी कोरोनावर मात केली आहे. आता मी आपल्या कर्तव्यावर रूजू झालो आहे. यामुळे लोकांनी कोरोना हा खूप भयानक आजार आहे अस मुळीच मानू तसेच तो खूप साधा आजार आहे  अस म्हणून बेपर्वाही करु नये. सर्वांनी लसीकरण करुन घेण्यात कुचराई न करता ज्या प्रमाणे मास्क आपल या संसर्गापासून बचाव करते तसे लसीकरण झाल्याने प्राण वाचवण्यास मदत होते. या उपचाराच्या दरम्यान बऱ्याच गोष्टी मला करता आल्या. ज्या की नोकरी करत असताना जमल्या नव्हत्या यात खूप जून्या चित्रपटाचा आस्वाद घेता आला. राहिलेल्या पुस्तकांचे वाचन करता आले आणि सर्व मित्रांशी मनसोक्त बोलण्यास वेळ मिळाला. याबरोबरच नोकरीत आल्यापासून एवढा आराम कधी करण्याची संधी मिळाली नव्हती. ती कोरोनाने मिळाली. ह्या सर्व गोष्टीतून मला सकारात्मक उर्जा मिळाली आणि यातून मी आज आपल्यासमोर कोरोनावर मात करून दैनंदिन कामकाज करीत आहे.

2.     डॉ.बीना सेंगर 

May be a closeup of 1 person

ना हो मन की दूरी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागातील सहयोगी प्राध्यापिका डॉ.बीना सेंगर यांनी आपला अनुभव व्यक्त करताना सांगितले की, मला जेव्हा कोरोनाची लक्षणे जाणवायला लागली तेव्हा मी प्रथम कोरोना चाचणी आणि सीटी स्कोअर केले. यात संसर्ग झाल्याचे समजले. मला इतर आजार असल्याने मी काळजी तर घेत होतेच, मी घरात एकटी राहत असल्याने सर्व गोष्टी करण्यास सोप्या गेल्या.  जास्त प्रमाणात संसर्ग झाला नसल्याने मी घरातच वैद्यकीय सल्ल्याने उपचार सुरू केले, समाजात आज वैद्यकीय मदत किंवा जेवण  संदर्भात घरपोहोच सेवा उपलब्ध असल्याने त्याचा मी फायदा घेतला. या दरम्यान माझ्या कार्यालयातील सहकारी वर्ग, मित्रपरिवार आणि माझे विद्यार्थी यांनी खूप सहकार्य केले. कोरोनावर मात करण्यासाठी माझ्यातील बोल्ड वूमन जागी झाली अस म्हणावे लागेल.कारण आपणही काही वेळेस एखाद्या गोष्टीचा मनातून स्वीकार केला की जास्त अडचणी येत नाही. योग्य आहार, व्यायाम, प्राणायम हे करित असताना घरातील 15 दिवस निघून गेले. या 15 दिवसाच्या कालावधीत ह्या आजाराने भाषा-प्रांत याच्या पलीकडे जावून माणूसकीचे दर्शन दिले. ते माझ्या सहकारी व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून. आपण फोनवर ऐकतो ना जी एक रिंगटोन  आहे  “दोन गज दूरी – मास्क है जरूरी “हे तर महत्वाचच आहे. पण कोरोना झाला म्हणजे व्यक्तीला मानसिक आजार देण्याची खूप गरज असते. यामुळे सर्वांनी न घाबरता या आजाराच्या संसर्गापासून बचाव करावा.मनामनातील अंतर दूर करुन जे काही मदतीसाठी करता येईल तो प्रयत्न करावा. सामाजिक अंतर पाहिजे पण मना-मनातले अंतर दूर करुन एकमेकांना प्रोत्साहित  केले की आपण  यावर मात करु शकतो. आज मी ही कोरोनावर मात केली आहे. आणि सध्या वर्क फ्रॉम होम करीत आहे. कोरोनातून बरे होण्यासाठी गरज आहे ती “चाहे हो कितने भी फासले या दूरी। मगर ना हो एक दुसरे की बारे मे मन मे दूरी…।

श्रीमती विजया डहाळे, पोलीस कॉन्टेबल. :-

May be an image of 1 person

‘मन मे है विश्वास’ गेल्या वर्षी या वर्षीच्या तुलनेत कोरोना या आजाराविषयी आपल्या सर्वांना नवीन असल्याने जास्त भीती आणि गैरसमज होते. औरंगाबाद पोलीस दलात प्रथम कोरोना बाधित झाले ल्या विजया डहाळे  यांनी कोरोनाला कसं सामोरे गेल्या यांचा अनुभव सांगितला आहे. “मी गेल्या वर्षी 22 मे 2020 ला क्रांतीचौक पोलीस स्टेशन हद्दीच्या कर्तव्यावर असताना कोरोना बाधित झाले होते. त्या वेळी आजूबाजूची परिस्थिती बघता प्रथम पोलीस प्रशासनात मीच कोरोना बाधित झाल्याने सर्वांचे लक्ष माझ्यावर  केंदित झालं होतं ,यावेळी विविध शंका ,प्रश्न मला लोकं, सहकारी आणि नातेवाईक विचारत होते ,याचं उत्तर देत देत मी ही कोरोना ला उत्तर दिले आणि बरी होत गेले.  कधी कधी तर काही आश्चर्यकारक अनुभव आले,  कोरोना पॉझिटिव्ह झाले तेंव्हा मी प्रथम रुग्णालयात दाखल झाले. मला दम्याचा आजार होता. तरी मी न घाबरता या आजाराबरोबरच वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देत स्वत:ला सावरत या आजारातून बरे झाले आणि पंधराव्या दिवशी मी परत माझ्या कर्तव्यावर हजर झाले. कमी कालावधीत मी सेवेत रूजू झालें. या कालावधीत मी एक पोलीस खात्यातील एक सहकारी आहे, आम्ही समाजासाठी. तुमच्यासाठी रात्रदिवस रस्त्यावर, ऊन -पावसात कर्तव्य बजावत आहोत. यामुळे  आपण  सर्वांनी “माझे कर्तव्य माझी जबाबदारीच” भान ठेवून सहकार्य केल तर आपण कोरोनावर नक्कीच मात करु. विना मास्क, आणि अत्यावश्यक काम नसेल तर घराबाहेर न  निघणं, ही स्वयंशिस्त आपण लावली पाहिजे. आम्हालाही मुल, घर, नातेवाईक, आजार आहेत. हे सर्वांना विसरुन पोलीस, प्रशासन, आरोग्य यंत्रणा कर्तव्यावर हजर आहोत ते केवळ तुमच्या सुरक्षेसाठी .यामुळे नागरिकांच्या सहकार्याने आपण कोरोनावर मात करु. कोरोनातून बरे झाल्यानंतर मी माझे कर्तव्य बजावत आहे. यामुळे कोरोना झालेल्यांनी न घाबरता या आजारातून सुखरूप बाहेर यावं. यासाठी मानसिकता खंबीर ठेवणं गरजेच आहे. शेवटी एवढच म्हणेल या आजारातून बरे होण्यासाठी ‘मन मे है विश्वास, पुरा है विश्वास हम होंगे कामयाब’….