… तरच आत्म्याचे पवित्र उत्थान 

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

मन स्वरुप शैतान को, बिन मारे नहिं शान्त । 

भजन तजन कुछ नहिं वने,दुखमय जीवन अन्त ।।३०।।

(स्वर्वेद प्रथम मण्डल दशम अध्याय) ०१/१०/३०

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

मनरूपी सैतानाला मारल्याशिवाय म्हणजेच दूर केल्याशिवाय आत्मा कधीही शांत होऊ शकत नाही. मनाच्या संबंधामुळे जीव शुभाशुभ कर्मांद्वारे सुख-दुःखाचा उपभोग करतो. मन असता भजन होऊ शकत नाही, कारण हे मन आपल्या विषय चंचलतेला सोडत नाही. म्हणूनच मनाच्या संकल्प-विकल्प, उपद्रव तसेच अशांतीमधे राहून या दुःखमय जीवनाचा अंती विनाश होतो. म्हणजेच मनुष्य जीवन व्यर्थ विषय उपभोगात पडून नष्ट-भ्रष्ट होऊन जातं. अध्यात्मिक जीवनच त्याग, तपस्या, सदाचार तसेच इंद्रिय निग्रहाने शुध्द आणि संस्कारी होऊन पुढे विकासाच्या मार्गावर चालू लागते आणि आत्म्याचे पवित्र उत्थान होते.

संदर्भ : *स्वर्वेद* 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org