आईसह मुलीचा विनयभंग करणार्‍या भोंदू बाबाच्या मुसक्या हर्सुल पोलिसांनी आवळल्या

औरंगाबाद, दिनांक 8 :इलाज करण्याचा बहाण्याने आईसह मुलीचा विनयभंग करणार्‍या भोंदू बाबाच्या रविवारी दि.7 रात्री हर्सुल पोलिसांनी मुसक्या आवळल्या. साईनाथ कारभारी गुंजाळ (55, रा. घृष्णेश्वर कॉलनी, जाधववाडी) असे भोंदू बाबाचे नाव असून त्याला मंगळवारपर्यंत दि.9 पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. खडसे यांनी सोमवारी दि.8 दिले.
प्रकरणात 30 वर्षीय विवाहीतेने फिर्याद दिली. त्यानूसार, डिसेंबर 2020 मध्ये फिर्यादीच्या सासर्‍याच्या ह्दयाचे ऑपरेशन झाले होते, त्यामुळे फिर्यादीची 17 वर्षीय मुलगी फिर्यादीच्या सासर्‍याकडे गेली होती. सात दिवसांनी परतल्यावर फिर्यादीच्या मुलीला उलट्या व पोटाचा त्रास सुरु झाला होता. त्यांनी अनेक दवाखाने करुनही त्रास थांबत नव्हता. तेंव्हा अनेकांनी त्यांना घृष्णेश्वर कॉलनीतील साईनाथ महाराजांकडे जाण्याचा सल्‍ला दिला. त्यानूसार फेबु्रवारी 2021 रोजी फिर्यादीही कुटूंबासह साईनाथ महाराज कडे गेली. त्यानंतर मुलीच्या उलट्या थांबल्या. त्यामुळे फिर्यादीच्या कुटूंबाचा त्याच्यावरील विश्वास वाढला.  व ते सकाळ संध्याकाळ महाराज कडे जावू लागले.
13 फेबु्रवारी रोजी सकाळी 9 वाजता फिर्यादी मुलीला घेवून महाराज कडे गेली. तेंव्हा त्या भोंदू महाराजने दोघींना वेगवेगळे बसवून डोळे बंद करण्यास सांगितले. आरोपीने मुलीवर इलाज केल्यानंतर फिर्यादीला पयाचा इलाज करण्याच्या नावाखाली अश्‍लिय चाळे करुन विनयभंग केला. मात्र मुलीला महाराजाचा गुण पडल्याने फिर्यादीने दुर्लक्ष केले. रात्री 9 वाजेच्या सुमारास आरोपीने त्यांना पुन्हा आपल्या घरी बोलावले व फिर्यादीच्या पतीला तुझ्यात दम नाही बायको सांभाळायला तु माझ्याकडे पाठव, मी सुदरवेन असे म्हणाला.
14 मार्च रोजी सकाळी फिर्यादीही मुलीसह भोंदूबाबाकडे जाण्यासाठी निघाली असता, मुलीने नकार दिला व भोंदू बाबाने आपल्यासोबत अश्‍लिल चाळे करुन विनयभंग केल्याचे सांगितले. त्यामुळे फिर्यादीने भोंदू बाबाकडे जाण्यास टाळले. 7 मार्च रोजी भोंदू बाबाने फिर्यादीच्या पतीला दक्षीणा देण्यासाठी बोलावले. त्यानूसार फिर्यादीपतीसह आरोपीच्या घरी गेले असता, त्याने पैशाच्या कारणावरुन फिर्यादीच्या कुटूंबाला धमकावण्यास सुरवात केल्याने ते घाबरले. प्रकरणात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक लोकाभियोक्‍ता राजू पहाडीया यांनी आरोपीन अशा प्रकारचा गुन्हा किती बालकांसोबत केला आहे याचा तपास करणे असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.