औरंगाबाद जिल्ह्यात 72 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,दोन मृत्यू

जिल्ह्यात 36937 कोरोनामुक्त, 271 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 02 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 130 जणांना (मनपा 74, ग्रामीण 56) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 36937 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 72 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 38282 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1074 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 271 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मनपाकडून 28 आणि ग्रामीण भागात 06 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (30) न्यू श्रेय नगर (1), शितल नगर (1), राजनगर (1), क्रांती चौक पोलिस क्वार्टर (1), एन सहा सिडको (5), साई समृद्धी अपार्टमेंट (1), टिळक नगर (1), एन अकरा टीव्ही सेंटर (1), श्रीराम अव्हेन्यू चौराहा (1), ऑरेंज सिटी, पैठण रोड (2), क्रांती चौक (1), पैठण रोड (3), जाधववाडी (1), मुकुंदवाडी (1), कांचनवाडी (1), हरिओम नगर (1), समर्थ नगर (1), टाऊन सेंटर (1), सातारा परिसर (2), खाराकुँवा (1), एन आठ सिडको (2)

ग्रामीण (14) चिंचाळा, पैठण (1), गंगापूर (1), वैजापूर (1), पैठण (4), कायगाव, सिल्लोड (1), वानेगाव, फुलंब्री (1), बकवाल नगर, नायगाव (1), पोखरी (1), ग्रेनोज कंपनी परिसर, गंगापूर (1), संजारपूर, गंगापूर (1), पढेगाव, गंगापूर (1)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत उस्मानपुऱ्यातील 80 वर्षीय पुरूष, खासगी रुग्णालयात जसवंतपुरा, सेंट्रल नाका येथील 65 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला