नांदेड जिल्ह्यात 128 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू

नांदेड दि. 5 :- शुक्रवार 5 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 128 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 58 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 70 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 96 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 2 हजार 60 अहवालापैकी 1 हजार 910 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 24 हजार 159 एवढी झाली असून यातील 22 हजार 612 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 729 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 19 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

गुरुवार 4 मार्च 2021 रोजी भावसार चौक नांदेड येथील 50 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 604 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 66, भोकर तालुक्यांतर्गत 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 9, देगलूर कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 14 असे एकूण 96 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 93.59 टक्के आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 37 हजार 66एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 8 हजार 651एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 24 हजार 159एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 612एकुण मृत्यू संख्या-604 उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 93.59 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-10आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-09आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-122रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-729आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-19.