नांदेड जिल्ह्यात 30 कोरोना बाधितांची भर, एकाचा मृत्यू

नांदेड दि. 2 :- बुधवार 2 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 30 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 15 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 15 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 38 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 1 हजार 297 अहवालापैकी 1 हजार 249 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 441 एवढी झाली असून यातील 19 हजार 342 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 355 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 14 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 550 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी कंधार तालुक्यातील मंगलसांगवी येथील 73 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 10, भोकर तालुक्यांतर्गत 2, हदगाव कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 5, मुखेड कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 3, खाजगी रुग्णालय 6 असे एकूण 38 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.62 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 10, कंधार तालुक्यात 1, मुखेड तालुक्यात 1, नांदेड ग्रामीण 1, हदगाव 1 , हिंगोली 1 असे एकुण 15 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 11, अहमदनगर 1, मुखेड 1, नागपूर 2 असे एकुण 15 बाधित आढळले.जिल्ह्यात 355 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 53 हजार 307निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 28 हजार 850एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 441एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 342एकूण मृत्यू संख्या- 550उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.62 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-496रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-355आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-14.

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.