राज्य महिला आयोगाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाचे 8 मार्चला उद्घाटन

औरंगाबाद, दि.05, :- विविध प्रकाराच्या अत्याचाराने पिडीत महिलांच्या तक्रार व निवारण समुपदेशानासाठी महाराष्ट्र  राज्य महिला आयोगाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाचे उद्घाटन पोलीस अधिक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील यांच्या हस्ते जागतिक महिला दिनी दि.08 मार्च,2021 रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने राज्यातील प्रत्येक विभाग स्तरावर राज्य महिला आयोगाची कार्यालये स्थापन करण्यासंदर्भात दि.10 फेब्रुवारी,2021 रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार औरंगाबाद विभागीय कार्यालय विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास,औरंगाबाद विभाग औरंगाबाद, ज्युबली पार्क चौक,सिटी सर्व्हे क्र.2974,प्लॉट क्र.5/5/53,पॅरा माऊॅट स्टोअर मागे,जिंदानी लॅब जवळ ,औरंगाबाद येथे सुरु करण्यात येणार आहे. या कार्यालयाचे उद्घाटन 8 मार्च रोजी होणार आहे.

राज्य महिला आयोगाच्या या औरंगाबाद विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी,  नांदेड, हिंगोली, लातूर व उस्मानाबाद या  जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण होण्याच्या दृष्टीने काम केले जाईल. त्यानुसार माहिलांना त्यांच्या इच्छेनुसार तज्ञ समुपदेशकामार्फत समुपदेशन केले जाईल. किंवा स्थानिक पोलीस स्टेशन कडून सहकार्य घेण्यात येईल.अतिमहत्वाच्या गंभीर स्वरुपाच्या तक्रारी किंवा स्वाधिकारे ( सुमोटो ) नोंद घ्यावयाच्या तक्रारींबाबत राज्य महिला आयोगाच्या सल्ल्याने कार्यवाही करण्यात येईल.महिला आयोगाच्या विभागीय कार्यालयाव्दारे प्रस्तावित,नियोजित सुनावण्या ऑन लाईन पध्दतीने घेण्यात येतील.

तरी औरंगाबाद विभागातील विविध प्रकाराच्या अत्याचाराने पिडीत महिलांनी व अशा महिलांकरिता मदत करु इच्छिणाऱ्यांनी 0240 – 2325570 या दुरध्वनी क्रमाकांवर व [email protected] या ईमेलवर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा,असे आवाहन महिला व बाल विकास औरंगाबाद विभागाच्या विभागीय उपआयुक्त श्रीमती एम.एम.पांचाळ यांनी केले आहे.