औरंगाबाद जिल्ह्यात 359 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,7 मृत्यू

जिल्ह्यात 6690 कोरोनामुक्त, 4921 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दि. 22 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 193 जणांना (मनपा 135, ग्रामीण 58 सुटी देण्यात आली. आजपर्यंत 6690 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 359 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12025 झाली आहे. आजपर्यंत एकूण 414 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4921 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 256 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 24, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 125 आणि ग्रामीण भागात 106 आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

शहर परिसरात २१५ बाधित

शहर परिसरातील नव्या बाधितांमध्ये जवाहर कॉलनी परिसर येथील ४, साई नगर, सातारा परिसर १, मोतीवाला नगर १, एमजीएम हॉस्टेल परिसर १, टाऊन सेंटर १, एन-सहा संभाजी कॉलनी ३, इंदिरा नगर, गारखेडा १, एन-सात १, म्हाडा कॉलनी, पीर बाजार १, बिस्म‍िल्ला कॉलनी ५, स्वामी विवेकानंद नगर १, क्रांती नगर २, बन्सीलाल नगर २, न्यू नंदनवन कॉलनी १, छावणी १, पद्मपुरा १, तथागत नगर १, राम नगर १, इंदिरा नगर, गारखेडा ४, आंबेडकर नगर ३, ब्रिजवाडी २, शिवाजी नगर ६, कासलवाल तारांगण परिसर, पडेगाव १, शिवाजी नगर, गारखेडा १, जवाहर कॉलनी १, नारेगाव २, पन्नालाल नगर १, रोशन गेट १, अल्तमश कॉलनी, सेंट्रल नाका १, हर्सूल १, भक्तीनगर, पिसादेवी रोड १, गारखेडा १, चिकलठाणा १, पदमपुरा २, छावणी परिसरातील १ येथील व्यक्तीचा समावेश आहे. तसेच सिटी एंट्री पॉईंटवर व मोबाईल स्वॅब कलेक्शनमध्ये आढळून आलेल्या बाधितांमध्येही बहुतांश शहरातील व्यक्तींचा समावेश आहे.  

ग्रामीण भागात १४४ बाधित

ग्रामीण भागातील नव्या बाधितांमध्ये औरंगाबाद तालुक्यातील १३, पैठण ५, हनुमान नगर, रांजणगाव १, चिंचोली लिंबाजी, कन्नड १, साकळी बुद्रुक १, सूर्यवंशी नगर, बजाज नगर १, श्रीराम नगर, बजाज नगर २, वडगाव कोल्हाटी १, खतखेडा, कन्नड १, रांजणगाव, गंगापूर १, महेबुबखेडा ३, पंचशील नगर, वैजापूर ५, तर जीवनगंगा, वैजापूर १, वाळूज १, समता नगर, सिल्लोड १, औरंगाबाद तालुका १३, फुलंब्री ३, गंगापूर २४, खुलताबाद १, वैजापूर ५६, पैठण ९ येथील रहिवाशांचा समावेश आहे.

सिटी एंट्री पॉइंटवर आढळले ३१ बाधित

सिटी एंट्री पॉईंटवर बाधित आढळून आलेल्या बाधितांमध्ये रांजणगाव ५, सिडको महानगर २, पैठण १, गारखेडा १, चित्तेगाव ४, अजिंठा १, समृद्धी महामार्ग कर्मचारी १, रामचंद्र नगर १, वाळूज २, बजाज नगर ४, रांजणगाव २, वडगाव १, उस्मानपुरा १, शिवाजीनगर २, इतर ठिकाणच्या ३ व्यक्तींचा समावेश आहे

औरंगाबादेत सात मृत्यू

शहरातील रामगर येथील ४२ वर्षीय पुरुष रुग्णाला १८ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे दुसऱया दिवशी स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा मंगळवारी (२१ जुलै) दुपारी साडेबाराला मृत्यू झाला. शिवनेरी कॉलनीतील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाला ३ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व दुसऱया दिवशी प्राप्त झालेल्या अहवालावरुन रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचार सुरू असताना रुग्णाचा मंगळवारी रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी मृत्यू झाला. तसेच पडेगाव येथील कासंबरी दर्गा परिसरातील ५५ वर्षीय महिला रुग्णाला मंगळवारी घाटीत दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे त्याच दिवशी स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा रुग्णाचा मंगळवारी रात्री आठ वाजता मृत्यू झाला. उमाजी कॉलनी येथील ६५ वर्षीय महिला रुग्णाला १८ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे २० जुलै रोजी प्राप्त झालेल्या स्वॅब रिपोर्टवरुन स्पष्ट झाले होते. उपचार सुरू असताना रुग्णाचा बुधवारी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी मृत्यू झाला. त्याचवेळी कन्नड तालुक्यातील टिळक नगरातील ७८ वर्षीय करोनाबाधिताचा पुरूष उपचारादरम्यान शहरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तर, बालाजी नगरातील ७२ व जुना बाजार येथील ६४ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ३१६, तर जिल्ह्यात ४१४ बाधितांचा मृत्यू झाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *