सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून स्व. गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन

Image

मुंबई, दि. ३ : माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गड येथील त्यांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले.

श्री. मुंडे म्हणाले, स्व. गोपीनाथराव मुंडे हे आपल्या गुरुस्थानी आहेत. त्यांच्या सोबतीने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली राजकीय जडणघडण झाली. स्व. मुंडे यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या ऊसतोड मजूर, कष्टकरी, वंचित-उपेक्षित, दीन-दुबळ्यांची सेवा करण्याची आपल्याला या सरकारमध्ये संधी मिळाली आहे. या वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठी, विकासासाठी बळ देण्याची भावनिक सादही श्री. मुंडे यांनी घातली आहे.

Image

येणाऱ्या काळात गोरगरीब-कष्टकरी, वंचित-उपेक्षित वर्गाच्या आयुष्यात थोडेफार जरी सकारात्मक बदल घडवणारे काम करता आले तर तिच स्व. मुंडे साहेबांना खरी श्रद्धांजली असेल. तसेच आपल्या गुरूला अर्पण केलेली गुरुदक्षिणा असेल, असेही श्री. मुंडे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *