मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध होऊन आम्ही काम करू-जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची ग्वाही

महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

औरंगाबाद | दि. १२
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे हे सरकार प्रभावीपणे काम करत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, व शिवसेना या तिन्ही पक्षाने उमेदवार सतीश चव्हाण यांच्यावर विश्वास टाकून मराठवाडा पदवीधर मतदार संघाची उमेदवारी त्यांना दिली असून मराठवाड्याच्या विकासासाठी कटीबद्ध होऊन आम्ही तिन्ही पक्ष काम करू अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांचा मराठवाडा पदवीधर मतदार संघाचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


मराठवाडा पदवीधर मतदार संघ, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज विभागीय कार्यालयाच्या निवडणूक विभागात बुधवारी (दि.१२) राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, पर्यावरण व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती होती.


अर्ज दाखल केल्यानंतर तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जालना रोडवरील आकाशवाणी चौकात उमेदवार सतीश चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, पर्यावरण व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना नेते  चंद्रकांत खैरे, आमदार विक्रम काळे, आमदार संजय दौड माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, किशोर पाटील, डॉ. नरेंद्र काळे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अभिजित देशमुख, काँग्रेसचे इब्राहिम पठाण, नवीन ओबेरॉय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा, छाया जंगले, शहराध्यक्षा, मेहराज पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती अध्यक्षा अंकिता विधाते यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, शिक्षक, प्राध्यापक आणि पदवीधर मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती


यावेळी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, सत्ता नसल्याने विरोधक गोंधळून गेले आहेत. त्यामुळे ते राजकीय खेळी करून पदविधरांचे मन आणि मत बदलू पाहत आहेत. या विरोधकांच्या भूल थापांना बळी न पडता पदवीधरांनी महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांना प्रचंड बहुमताने विजयी करून त्यांना पुन्हा विधान परिषदेत पाठविण्यासाठी आणि पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी संधी द्यावी व विजयी करावे असे आवाहन खासदार खैरे यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी आमदार विक्रम काळे यांनीही सतीश चव्हाण यांना निवडून देण्याचे आवाहन उपस्थितांना केले. 


सतीश चव्हाण यांचा आज लातूर, उस्मानाबाद दौरा

औरंगाबाद* – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 1 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण शुक्रवारी (दि.13) लातूर, उस्मानाबाद दौऱ्यावर येणार असून विविध ठिकाणी ते पदवीधर मतदारांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 10.30 वा. औसा येथील आझाद महाविद्यालय, दुपारी 12.30 वा. निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय, दुपारी 3.30  वा. उमरगा येथील शांताई मंगल कार्यालय, सायं 6 वा. मुरूम येथे भेट देऊन सतीश चव्हाण शिक्षक, प्राध्यापक, पदवीधर मतदारांशी संवाद साधणार आहेत.