बोराळकरांसाठी एकाच तिकिट कापले-भाजप नेत्या पंकजा मुंडे

Image

औरंगाबाद:भाजपमध्ये बंडखोरी झाली या केवळ चर्चा असून भाजपचाच असलेला मराठवाडा पदवीधर मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी एकसंघाने कामाला लागा, असे आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले. औरंगाबादेत येण्यासाठी विमानाचे तिकीट मि‌ळत नव्हते. एकाचे तिकीट कापून बोराळकरांसाठी आले, असे वक्तव्यही त्यांनी केले. 

औरंगाबादमधून भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर आज शक्तिप्रदर्शन करत नेत्यांसोबत अर्ज दाखल केला.  

बोराळकर यांच्या संपर्क कार्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.पक्ष नेत्या विजया रहाटकर, खासदार डॉ. भागवत कराड, प्रितम मुंडे, आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, रमेश कराड, अभिमन्यु पवार, सुरेश धस, मेघना बोर्डीकर, बबनराव लोणीकर शहराध्यक्ष संजय केणेकर आदींसह मराठवाड्यातील आजी- माजी आमदार व जिल्हाप्रमुख उपस्थित होते.

Image

पंकजा मुंडे म्हणाल्या , गोपीनाथ मुंडे आणि भाजप हे एक समीकरण आहे. हा पक्ष माझ्या बापाचा पक्ष आहे. याचा मला अहंकार नाही तर माझे  प्रेम आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवार म्हणून दोन तीन नावे सुचविले जाते. समाज संतुलन बांधले जाते. त्यावेळी बोराळकर यांना पुर्व कल्पना देत त्याचे नाव सुचविले नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद करत पक्षाच्या चिन्हावर उभा राहिलेला उमेदवाराचा विजय झालाच पाहिजे, हेच संस्कार लोकनेते मुंडे यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा भाजपचाच होता. तो पुन्हा ताब्यात घेण्यासाठी एकसंघपणे कामाला लागा, असे आ‌वाहनही त्यांनी केले.

केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी छोट्याखानी भाषण करताना महाराष्ट्रातले आपले सरकार गेल्यानंतरची ही पहिलीच निवडणुक आहे. त्यामुळे ही निवडणुक कोणत्याही एका नेत्याची नाही तर ती सर्व कार्यकर्त्यांची आहे. यामुळे कोणताही कार्यकर्ता हयगय करणार नाही असा विश्वास व्यक्त केला.

वारंवार केंद्राला पैसे मागणाऱ्यांनी चोरून लग्न केले असून त्यांनी आता बापाला पैसे मागू नये,आता तुमचे सरकार तुमची जबाबदारी आहे, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे त्यांनी राज्यातील आघाडी सरकारला भाजप कार्यकर्ता मेळाव्यात हाणला. तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात जे पूर्ण शक्तीनिशी उतरणार नाहीत त्यांच्या राजकीय भवितव्यावर विचार केला जाईल, असा इशाराही दानवे यांच्यासह अन्य नेत्यांनी यावेळी दिला.