इनरव्हील क्लबच्या वतीने श्रेयस बालक मंदिराचा कायापालट

लता पद्माकर मुळे यांचा पुढाकार 

छत्रपती संभाजीनगर ,१ डिसेंबर / प्रतिनिधी :-श्रेयनगर येथील श्रेयस बालक मंदिर, प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाचे पटांगण आज खऱ्या अर्थाने सकाळीचं फुलून गेले होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू मावत नव्हते आणि शिक्षकांच्या नजरेत आनंद दिसत होता, निमित्त होतं इनरव्हील क्लब, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने या शाळेच्या करण्यात आलेल्या कायापालटाचे प्रोजेक्ट मॅनेजर लता पद्माकर मुळे यांच्या नेतृत्वात इनरव्हील क्लब, छत्रपती संभाजीनगरच्या ‘हॅपी स्कूल प्रोजेक्ट’ अंतर्गत या शाळेतील विद्यार्थ्यांसाठीचे शिक्षण आनंददायी आणि सुकर होण्याच्या दृष्टीने आवश्यक सेवा, सुविधा, बाथरूम, सभागृह, क्लास रुम, नवीन बेंचेस व शाळेच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले.            

समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी इनरव्हील क्लब, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने कायम मदतीचा हात पुढे केला जातो. यात अपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांना आनंददायी व दर्जेदार शिक्षण मिळावे. यास प्राधान्य दिले जाते. याचं भूमिकेतून सुरू असलेल्या श्रेयस बालक मंदिरातील जीर्ण भिंती गेल्या अनेक वर्षापासून रंगाच्या प्रतीक्षेत होत्या. वर्ग खोल्या, अभ्यासिका निरस झाल्या होत्या, इनरव्हील क्लब, छत्रपती संभाजीनगरच्या हॅपी स्कूल प्रोजेक्ट अंतर्गत या शाळेचे संपूर्ण नुतनीकरण करण्यात आले. श्रेयस बालक मंदिर आणि माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीचे संपूर्ण रंगकाम करण्यात आले. मालपाणी परिवार चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्री. पद्माकर मुळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांनी हा प्रकल्प आयोजित केला होता. 

        काही दिवसांपूर्वी या शाळेत सीएसएमएसएस येथील तज्ञ डॉक्टरांमार्फत शिबिरात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या एकूण ७४९ विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करून रक्तगटाची नोंदणी करून त्यांना रक्तगट कार्ड देण्यात आले तसेच जवळपास ७५८ विद्यार्थ्यांची मोफत दंत आणि आरोग्य तपासणी करण्यात आली होती आणि विद्यार्थ्यांसाठी बालऊपयोगी व बाल साहित्यांची पाच हजार रुपयांची पुस्तके, ५० चटई, खुर्च्या, स्कूल बॅग्स, खेळाचे साहित्य भेट म्हणून देण्यात आले.           

यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्रेयस शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्षा सुषमा मुळे, प्रोजेक्ट मॅनेजर लता पद्माकर मुळे, शाळेच्या मुख्याध्यापिका धुमाळ यांच्यासह येणार होईल इनरव्हील क्लब, छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष डॉ. इना नाथ, सचिव विजया नानकर, उषा धामणे, माधुरी अहिरराव, मंगल चव्हाण, शामल भोगले, वृषाली शिंदे, वसुंधरा पाटील, मुख्याधिपिका शैला धुमाळ, श्वेता पवार आणि श्रेयस बालक मंदिर आणि माध्यमिक विद्यालयाची शिक्षक, विभागप्रमुख आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.