पीडित महिलेच्या कुटुंबियांना धीर:नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

छत्रपती संभाजीनगर,१०  एप्रिल / प्रतिनिधी :-  चिकलठाणा येथील  महिलेवर स्थानिक तीन नराधमांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली. राज्यात माता भागिनी सुरक्षित नसल्याचे समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या गंभीर घटनेची दखल घेत पीडित महिलेच्या घरी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भेट देऊन कुटुंबियांना धीर देत शिवसेना पाठीशी असल्याचे सांगितले. पिडीतेला तातडीने न्याय मिळावा आणि नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.

यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब डांगे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, महिला आघाडीच्या संपर्क संघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्क प्रमुख सुनीता देव, उपजिल्हा संघटक अनिता मंत्री, नगरसेवक मनोज बन्सिलाल गांगवे, रमेश दहीहंडे, संतोष जाटवे, उपशहर प्रमुख सचिन वाघ, वल्लभ भंडारी आदींसह नागरीक उपस्थित होते.