छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात कॅम्पस मुलाखतीमध्ये १५८ विद्यार्थ्यांची निवड

छत्रपती संभाजीनगर ,२६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचालित छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी झालेल्या कॅम्पस इंटरव्हुमध्ये १५८ विद्यार्थ्यांची निवड झाली. यात महाविद्यालयाच्या सिव्हील विभागातील ३५ विद्यार्थ्यांची ‘कोअर प्रोजेक्ट इंजिनियर्स अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लि.’ या नामांकित कंपनीत निवड झाली व इतर सहभागी झालेल्या सर्व महाविद्यालयातील १२३ विद्यार्थ्यांची निवड झाली.           

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. रणजीत मुळे, सचिव श्री. पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. संदीप अभंग, स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सोहेल अली यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच इंटरव्हुच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रशांत जाधव, प्रा. संजय कुलकर्णी , प्रा. सतीश मनाळ, डॉ. मनोज मते, प्रा. अजय बूटवाणी, प्रा. केशव काळे आदींनी परिश्रम घेतले.