संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात उद्देशिका वाचन

छत्रपती संभाजीनगर ,२६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-संविधान दिनानिमित्त   जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. तहसिलदारतेजस्विनी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहीक वाचन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, गणेश गुसिंगे, रफीक शेख, याकुब खान यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.