‘आयुष्मान भारत’ योजनेद्वारे सुरक्षित करा आपले,आपल्या कुटुंबियांचे आरोग्य

विकसित भारत संकल्प यात्रेत नवीन कार्ड घेण्याची, ई- केवायसी करण्याची संधी

छत्रपती संभाजीनगर ,२६ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :-जिल्ह्यामध्ये मंगळवार दि.२८ पासून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरु होत आहे. या संकल्प यात्रे साठी ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ ही मुख्य योजना म्हणून निवडण्यात आली आहे. या यात्रेदरम्यान जिल्ह्यातील नागरिकांनी ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ अंतर्गत आपली नोंदणी करुन आपले आपल्या कुटुंबियांचे आरोग्य सुरक्षित करा. या सोबतच नवीन कार्ड घेण्याची तसेच जुन्या नोंदणीची ई-केवायसी करण्याची संधीही या यात्रेदरम्यान उपलब्ध राहणार आहे, असे उपमुख्यकार्यकारी अधिकारी ओमप्रकाश रामावत यांनी कळविले आहे.

विकसित भारत संकल्प यात्रा

‘विकसित भारत संकल्प यात्रेचा’ मुख्य उद्धेश केंद्र शासनाच्या जनकल्याणकारी योजना आणि विकास धोरणांबाबत प्रसिद्धी व प्रचार करून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, योजनेच्या पात्र वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे व त्यांना लाभ मिळवून देणे, शासनाच्या विकास धोरणांबाबत जनसामान्यांमध्ये विश्वास निर्माण करणे हा आहे. जिल्ह्यामध्ये मंगळवार दि.२८ पासून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरु होत आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही योजना या यात्रेसाठी मुख्य योजना म्हणून निवडण्यात आली आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातली सर्वात मोठी शासकीय मोफत आरोग्य विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष प्रतिकुटुंबास ५ लाख रुपयापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार व शस्रक्रिया या योजनेच्या अंगीकृत रुग्णालयात घेता येतात.

जिल्ह्यात २३ लाखांहून अधिक लाभार्थी

आयुष्मान कार्ड (ई- कार्ड) लाभार्थ्यांची जिल्ह्यात एकूण संख्या २३ लाख २९ हजार ४२४ आहे. त्यापैकी ४ लाख १४ हजार १६२ लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड (ई- कार्ड) eKYC पूर्ण केली आहे. अजून १९ लाख १५ हजार २६२ लाभार्थ्यांची eKYC होणे बाकी आहे.

अशी होईल नोंदणी आणि केवायसी

                      आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आयुष्मान कार्ड (ई- कार्ड) काढण्यासाठी आपल्या जवळील आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका / आपले सरकार सेवा केंद्र/कॉमन सर्विस सेंटर केंद्र/ स्वस्त धान्य दुकानदार यांना भेट द्यावी, आपले नाव लाभार्थ्यांच्या यादीमध्ये असल्यास रेशन कार्ड, आधार कार्ड व आधार संलग्नित मोबाईल क्रमांक घेऊन आपली ई कार्ड बनवण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान पात्र असणाऱ्या वंचित लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड – eKYC करून त्यांना आयुष्मान कार्ड (ई- कार्ड) वितरित करण्यात येणार आहे.

आयुष्मान कार्ड संदर्भात उपलब्ध माहितीचे स्रोत

आयुष्मान कार्ड (ई- कार्ड)-eKYC संबंधित सर्व माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर खालील वेबलिंक Google वर search केल्यास  उपलब्ध आहे.  

https://aurangabad.gov.in/आयुष्मान-भारत-प्रधान-मंत/

१. आपले नाव यादीत आहे कि नाही तपासून घेण्यासाठी शहर व ग्रामीण भागातील आयुष्मान कार्ड लाभार्थ्यांची यादी

२. आयुष्मान कार्ड (ई- कार्ड)eKYC करण्यासाठी अधिकृत ग्रामीण भागातील ग्रामपंचायत मधील आपले सरकार केंद्र

३. आयुष्मान कार्ड (ई- कार्ड) eKYC करण्यासाठी  ग्रामीण व शहरी भागातील अधिकृत कॉमन सर्विस सेन्टर(CSC )

४. आयुष्मान कार्ड (ई- कार्ड) eKYC करण्यासाठी  ग्रामीण व शहरी भागातील अधिकृत आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका

५. आयुष्मान कार्ड (ई- कार्ड) eKYC करण्यासाठी  ग्रामीण व शहरी भागातील अधिकृत स्वस्त धान्य दुकानदार

                       लाभार्थी लॉगिन (Beneficiary Login) चा वापर करून तुम्ही स्वतःचे व तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे आयुष्मान कार्ड (ई-कार्ड ) आयुष्मान  अँप (Ayushman app) गूगल प्ले स्टोर (Google Play Store) वरून डाउनलोड करून करू शकता.

Google Play स्टोर मधून Ayushyaman App डाउनलोड करण्यासाठी

https://play.google.com/store/apps/details?id=com.beneficiaryapp

या लिंकवरुन करता येईल.

आयुष्मान  ॲप (Ayushman app) द्वारे आयुष्मान कार्ड ( ई-कार्ड ) बनविण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या YouTube video लिंक वर क्लिक करून अधिक माहिती घेऊ शकता.

जिल्ह्यातील नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ अंतर्गत आपली नोंदणी करुन आपले आपल्या कुटुंबियांचे आरोग्य सुरक्षित करा. या सोबतच नवीन कार्ड घेण्याची तसेच जुन्या नोंदणीची ई-केवायसी करण्याची संधीही या यात्रेदरम्यान उपलब्ध राहणार आहे, असे उपमुख्यकार्यकारी अधिकारी ओमप्रकाश रामावत यांनी कळविले आहे.