विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावासह महानगरातही शासकीय योजनांचा जागर -केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर,२२ डिसेंबर / प्रतिनिधी :-विकसित भारत संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत गावागावात जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरासह जिल्हाभरात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना गरिबातील गरिब कुटुंबापर्यंत पोहोचवा, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केले. विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जावून विकासाच्या विविध शासकीय योजनांचा जागर करणार असल्याचेही ते म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर येथील साई मैदान येथे विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. कराड  बोलत होते. यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त अंकुश पांढरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा,  डॉ. मनिषा थोबे, समिर राजुरकर, संजय केनेकर, संजय कोडगे, अनिल मकारिये , राजु पळसकर, श्रीमती पद्मा शिंदे, श्रीमती माधुरी आदवत, सामाजिक कार्यकर्ते रवी राजपुत,  महेश माळवदकर, रवी एडके, प्रशांत मोदी, आदी उपस्थित होते.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचला पाहिजे. तसेच यामाध्यमातून लाभार्थी कुटुंबाच्या घरात समृदधी अणण्याचा प्रयत्न आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांची माहिती आपल्या वार्डात सर्वांपर्यंत पोहोचयाला हवा तसेच विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मिशन मोडवर काम करा. योजनांच्या लाभापासून कोणताही घटक वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे त्यांना आवश्यक ते उपचार मिळावेत यासाठी  जनतेला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची शासनाची योजना आहे. शासनाच्या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी डीबीटीद्वारे निधी वितरण करण्यात येत आहे. आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला गॅस योजना, यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आहेत, या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनीही पुढे यावे.यावेळी हडको परिसरासह महागनरातील नागरिक उपस्थित होते.