प्रतापराव बोराडे म्हणजे दूरदृष्टि असणारी कर्तृत्ववान तरुणांची पिढी निर्माण करणारे प्राचार्य-खासदार शरदचंद्र पवार

छत्रपती संभाजीनगर,१६ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- प्रतापराव बोराडे यांनी अनेक दशकं विद्यार्थी घडविण्याची कामगिरी केली. नाविन्यता, कल्पकता, शिस्त या आपल्या वैशिष्ट्यांसह त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला एक दिशा दिली. प्रतापराव बोराडे म्हणजे दूरदृष्टि असणारी कर्तृत्ववान तरुणांची पिढी निर्माण करणारे प्राचार्य असे प्रतिपादन खासदार शरदचंद्र पवार यांनी आज येथे केले.

मराठवाड्यामध्ये अभियांत्रिकी शिक्षणाचा पाया रचणारे शिक्षण तज्ञ, जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय प्राचार्य प्रतापराव बोराडे यांच्या स्मरणार्थ महात्मा गांधी मिशनकडून आयोजित श्रद्धांजली सभा आज एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात खासदार शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी श्री. पवार बोलत होते.

यावेळी प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचा मुलगा शशीभूषण बोराडे यांनी आपल्या वडिलांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. या शोक सभेस कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, खासदार फौझिया खान, आमदार राजेश टोपे,माजी  केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड, नंदकिशोर कागलीवाल, अंकुशराव भालेकर, डॉ.सविता पानट, सी.पी त्रिपाठी, डॉ.अरविंद गोरे, प्राचार्य कै.बोराडे यांचे माजी विद्यार्थी, आप्तस्वकीय, बोराडे कुटुंबीय व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या सभेत शरद पवार यांनी प्राचार्य प्रताप बोराडे यांना वाहिलेली श्रद्धांजली त्यांच्याच शब्दांत 

प्रतापरावांनी गेले अनेक वर्ष विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्याची कामगिरी केली. हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला एक दिशा दिली. त्यामध्ये त्यांची काही वैशिष्ट्ये होती. नाविन्यता, कल्पकता, शिस्त या सर्वांच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचे काम त्यांनी केले. आणि हे सर्व करत असताना विद्यार्थी हिताचे निर्णय घेण्यासाठी ते कधी मागे हटले नाहीत. त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रीय सेवा दलाचे संस्कार त्यांच्यावर होते. त्याबरोबरच समाजाच्या विचारांशी संबंधित असलेली आस्था त्यांना प्रचंड होती. कधीकाळी सर्व मित्र मंडळी सोबत बैठकीची संधी मिळायची त्यावेळेला प्रतापरावांची उपस्थिती ही कटाक्षाने असायची. त्यावेळी अनेक गोष्टी त्यांच्याकडून ऐकायला मिळायच्या. त्यांचे इंजीनियरिंग बद्दलचे ज्ञान हे उल्लेखनीय होते. खरं म्हणजे ते ग्रामीण सामान्य कुटुंबातील पार्श्वभूमीचे आणि असे असताना देशाच्या काही सामाजिक शैक्षणिक संस्था आहेत, सहसा इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये पवईची आयआयटी याचा उल्लेख प्रकर्षाने करावा. प्रतापरावांनी तिथे शिक्षण घेतले, इंजिनियरिंगच्या क्षेत्रातले ज्ञान संपादन केले, यामध्ये गमतीची गोष्ट माझी आणि त्यांची भेट झाली कशी त्याला दोन कारणे आहेत एक माझे सहकारी कवी तुषार कदम यांच्या सभेत अनेकदा प्रतापरावांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांची ओळख जी झाली, ती महाराष्ट्रामधील काही प्रश्नांवर चर्चा करण्यात झाली. उदाहरणार्थ, सीमा प्रश्न, अजून बेळगाव, काळगाव, निपाणी अजून हे सर्व प्रश्न शिल्लक आहेत आणि लोकांना माहिती आहेत. पण त्याच काळामध्ये कर्नाटकाशी संबंधित आपले काही प्रश्न होते तसे गुजरातचे सुद्धा होते. दान तलासरीच्या पुढच्या भागांमधल्या मराठी आदिवासींचा उल्लेख हा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र झाल्यानंतर मिळाला नव्हता. आणि त्याचे सुद्धा एक प्रकारचे संघर्ष त्या काळामध्ये होत असे. आणि एक दिवशी आम्ही काही लोक त्या संघर्षासाठी तलासरी आणि त्या भागात गेल्यानंतर कारवाई करण्यात आली आणि ती कारवाई केल्यानंतर पलीकडच्या गुजरात सीमेवरचे वापी या ठिकाणी आम्हाला नेण्यात आले. आणि नंतर सोडून दिले. आणि त्यावेळी वापीमध्ये कुणीतरी सांगितले की इथे मराठी कुटुंब आहे आणि त्या मराठी कुटुंबाचा शोध घेतला ते दुसरे तिसरे कोणी नव्हते तर प्रतापराव बोराडे आणि त्यांच्या पत्नी होत्या.

वापीला एका प्लास्टिकच्या कंपनीमध्ये ते नोकरी करत होते. चांगले काम त्यांनी केलं आणि नंतरच्या काळामध्ये आणि त्यांना कंपनीने मुंबईच्या कांदिवली भागामध्ये त्या कंपनीची एक शाखा होती जी बंद पडलेली होती तिची जबाबदारी दिली. ३ वर्ष बंद पडलेला कारखाना आणि त्याबद्दलची सूचना आणि तो त्यांनी सुरू करून दाखवला. आणि कामगारांमध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण करून कारखाना टिकला तरच कामगारांचे संसार टिकतील जसे मालकांनी कामगारांची योग्य भूमिका घेतली पाहिजे तसेच कामगारांनी सुद्धा ही संस्था टिकली पाहिजे याबद्दलचे सूत्रे ही त्यांच्या मनात रुजवले आणि त्यामुळेच तो कारखाना सुरू झाला. आणि त्यांचे हे कर्तृत्व बघून कंपनीने त्यांना कांदिवलीला पाठवले. अनेक वर्ष आमचे अगत्याचे कारण हे महाविद्यालय हे महाविद्यापीठ बाबुरावजी, कमलभाऊ आणि प्रतापराव यांनी काढायचा निर्णय घेतला.

इंजिनियरिंग कॉलेज त्या काळामध्ये नुकतेच वसंतदादांनी जाहीर केले होते. प्रायव्हेट इंजीनियरिंग कॉलेजचे आणि त्या धोरणांनुसारचे हा संस्था काढण्याचा निकाल घेतला. कॉलेज काढल्यानंतर तिथे एक शिकायत होती ३ लाख रुपये तिथे डिपॉझिट दिले पाहिजे, माझ्या कानावर हा विषय घातला मी कमलभाऊंना विचारले तुम्ही स्वतः इंजिनियर आहात तुम्हाला माहिती आहे, बाबुराव इंजिनियर आहेत त्यांनी सांगितले याचा विचार मी केलाय. प्रतापरावांचा सल्ला घेतलाय. आणि याच्या पुढे जायचे आहे पण हे पैसे जे आहेत ते कमी करता येत नाही. त्यावेळेला महाराष्ट्र बँकेमध्ये तत्त्वधर नावाची गृहस्थ चेअरमन होते. त्यांना मी फोन केला. त्यांना भेटायचे आहे असे सांगितले मग मी आणि कमलभाऊ गेलो, तत्वधरांनी सांगितले कोणीतरी गॅरंटी घेतली पाहिजे. मी विचारले माझी चालेल का ? त्यांनी सांगितले, तुम्ही सही करून डॉक्युमेंट करून देत असाल तर चालेल. मी बोललो आणा डॉक्युमेंट काय असेल ते त्यांनी डॉक्युमेंट आणली मी सही केली आणि कॉलेजच्या परवानगीने जी अट महत्त्वाची होती त्याची पूर्तता झाली. कॉलेजचे काम सुरू झाले आणि त्याला खरा अर्थाने एक आगळे वेगळे उच्च दर्जाचे स्वरूप ते प्रतापरावांच्या दृष्टीमुळे आणि बांधिलकीमुळे बाबुराव आणि कमलरावांची साथ होती त्यामुळे हे होऊ शकले आणि त्यामुळे हजारो विद्यार्थी त्याच्यातून तयार झाले. मला आठवते मी आणि एकदा कमल भाऊ कुठेतरी अमेरिकेत, इंग्लंडमध्ये का युरोपमध्ये गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर एक नवजात गोष्ट त्या देशांमध्ये दिसत होती. की तिथे इंजिनियरिंगचे काही ना काही तरी विद्यार्थी भेटायचे. प्रतापरावांची आठवण करणारे विद्यार्थी भेटायचे. महाराष्ट्रामध्ये भेटली तर समजू शकतो, पण इंग्लंड, अमेरिकेमध्येसुद्धा त्यांच्याबद्दलची आस्था असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच भेटायचा. आणि अनेक आठवणी ते प्रतापरावांबद्दल करून त्याठिकाणी सांगायचे हे आगळ- वेगळ चित्र त्यांच्याबाबतीत मी पाहिलेले होत. आणि म्हणून शेवटी जे काही उभे केले ते कायम लोकांच्या लक्षात राहील अशाप्रकारचे झाले.

एकदा लोकांनी बारामतीला इंजीनियरिंग कॉलेज काढावा असा विचार केला, काय करायचे कसे करायचे असे मी कमलभाऊंना विचारले, कुणीतरी चांगली व्यक्ती हवी, कमल भाऊ म्हणाले, तुम्ही जो प्रश्न विचारत आहे त्याचे उत्तर माझ्याकडे आहे परंतु मी जरा अस्वस्थ आहे. मी विचारले काय उत्तर आहे, ते बोलले तुम्ही जर कॉलेज काढत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रतापरावांना घेऊन जावे लागेल त्यांना सोडावे असे मला वाटत नाही पण तुम्ही म्हणताय. कॉलेजच्या वास्तव्यात ते असायला हवे आणि ते कॉलेज पूर्णपणे तयार झाल्याच्या नंतर पुन्हा ते या ठिकाणी येतील ही अट तुम्हाला मान्य आहे, तर मी म्हणालो हो मान्य आहे. आणि प्रतापराव त्या ठिकाणी आले आणि त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेज त्या ठिकाणी उभे केले. आज बारामती मधील जे चांगले इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ते सर्व त्यांच्यामुळेच. त्या कॉलेजचे एक क्रांतीचे वैशिष्ट्य होते माझे एक मित्र आहेत जे आता हयात नाहीत तुम्हा लोकांना त्यांचे नाव माहिती असेल ते म्हणजे राहुल बजाज. राहुल बजाज यांचे एक वैशिष्ट्य होते ते दरवर्षी मार्च एंड झाला की मला त्यांचा फोन यायचा, शरद भाऊ कोणती शिक्षण संस्था घेतली, शेतीच्या बाबतीत काही नवीन प्रयोग आहेत का ? आणि ती सर्व माहिती दिल्यानंतर दरवर्षी त्यांच्याकडून मला चार ते पाच कोटींचा चेक न मागता यायचा. प्रतापरावांना हे माहिती होते कॉलेज काढले कॉलेजचे काम सुरू केले त्याचे नाव फक्त बारामती इंजिनिअरिंग कॉलेज होते मी सहज एक दिवशी त्यांना म्हटलं की आपण चांगल्या व्यक्तीचे नाव त्यांना देऊया आणि नाव देण्यासाठी पैसे घ्यायचे नाहीत तुम्हाला काही सुचवायचा आहे का ? मी सांगितले की माझ्या डोळ्यासमोर गांधीवादी विचाराचा एक नाव आहे आणि ज्यांचे नाव आहे त्यांच्या कुटुंबीयांनी न सांगताच तुम्हाला सहकार्य केलेले आहे. आणि म्हणून त्याचा विचार केला तर, आणि ते नाव कमल नयन बजाज मग काय मान्य..

आज त्या कॉलेजचे नाव कमल नयन बजाज आहे आणि त्या नावास आणि त्या नावासंबंधीची सूचना प्रतापरावांची होती अशा अनेक गोष्टी इथे उद्योगांचे काही त्यासाठी असोसिएशनचे काही ऑर्गनायझेशन केली त्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अनेक वेळेला आम्ही लोक सत्तेमध्ये असल्यानंतर आम्हा लोकांशी सुसंवाद साधला आणि त्याविषयी तो छोटा उद्योजक जाईल कसा याची खबरदारी घेत आपले विषयी शैक्षणिक सेवेचे काम करत असताना मराठवाडा क्षेत्र औरंगाबाद या परिसरातल्या औद्योगिकरणाच्या संबंधी सुद्धा प्रतापरावांचे लक्ष अत्यंत असायचं आणि या उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अनेक वेळेला राज्य सरकारशी अत्यंत पोट तिडकीने आग्रहाने भूमिका मांडल्या मी प्रश्नांची सोडवणूक केली ते गेले बरेच दिवस आजारी होते मागच्या माझ्या संभाजी ब्रदरच्या मिटिंग मध्ये मी त्यांना भेटायला गेलो आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटल्यानंतर मला सांगण्यात आले होते ते फारसं कोणाला ओळखत नाहीत मी गेलो आणि त्यांनी डोळे उघडले आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य बघायला मिळालं

मला इतके बरे वाटले, मी जे ऐकले होता त्यांच्या प्रकृती बद्दलची एकंदरीत स्थिती आणि गेल्यानंतर त्यांचा चेहरा त्याच्या वरचा हास्य एक आगळा वेगळा अशा प्रकारचा ते होता डॉक्टरांना अधून मधून मी विचारात असे फोन करून शेवटी शेवटी मला सांगण्यात आले आता डॉक्टरांना मर्यादा आहेत याचा अर्थ काय होणार हे ध्यानात आले असून सुद्धा आह्मी लोक सगळे पण तुमच्या आणि आमच्या हातात काही गोष्टी होत नाही जे घडू नये असे वाटत होते ते घडले प्रतापराव आपल्यातून निघून गेले ते गेले आणि त्यांनी कर्तुत्व दूरदृष्टी असलेली तरुणांची पिढी आणि ती तरुणांची पिढी सुद्धा अभियंत्यांची पिढी ही तयार करण्यासंबंधीचा मोलाचं काम केलं आणि माझी खात्री आहे की प्रश्न अनेक असतील पण त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची दृष्टी असलेली एक कर्तुत्ववान पिढी ही प्रतापरावांनी उभी केली आणि ती आणि त्यांचे कर्तुत्व आणि त्याचे परिणाम हे प्रत्येकाला प्रतापरावांचे स्मरण करण्याचे प्रवृत्त करतील हाच मला विश्वास आहे. प्रतापराव गेले आम्हा सर्वांनी संबंधीची आस्था करणारे अखंड आम्हाला लोकांना साथ आणि प्रेम देणारे, आणि समाजाची कर्तुत्ववान पिढी कशी उभी राहील यासाठी पडेल ते कष्ट करणारे सेवा दलाची पार्श्वभूमी असलेले साने गुरुजींचा विचार अंत:करणांमध्ये ठेवणारे आज प्रतापराव आपल्यातून निघून गेले त्यांना मी या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो आणि माझे दोन शब्द संपवतो…!