ज्ञानतीर्थ युवक महोत्सवातील नृत्याविष्कारातून प्रकटले दुर्गा, कृष्ण आणि नरसिंह

लातूर ,१४ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-ज्ञानतीर्थ युवा महोत्सव 2023 पं. कुमार गंधर्व मंचावर शनिवार रोजी सकाळी शास्त्रीय नृत्य या कलाप्रकरात एकुण 6 स्पर्धकांनी आपली कला सादर केली. यात एम जी एम कॉलेज नांदेड च्या मधुरा राजूरकर ने नृत्याविष्कार द्वारे विविध भावमुद्रा सादर केल्या. दयानंद कला महाविद्यालय लातूरच्या ऋचा कुलकर्णीने आपल्या भाव भरतनाट्यम या नृत्य प्रकारातून महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरण हा प्रसंग प्रेक्षकांसमोर जिवंत केला व कृष्णाचे दिव्यदर्षन उपस्थितांना घडविले.

तसेच दयानंद वाणिज्य महाविद्यालय,लातूर च्या ऋतुजा सुर्यवंशी,लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद च्या अभिज्ञा मनुरकर, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर च्या गायत्री सुतार यांनी आपल्या नृत्यातू न दुर्गांचे व जयक्रांती महाविद्यालय, लातूरच्या सूरज सुर्यवंशीने नृसिंहाचे दर्शन घडविले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्थानिक व्यवस्थापन समिती या नात्याने प्रा. चांदेश्वर यादव, प्रा दिनेश जोशी, प्रा प्रेमसागर मुंदडा, प्रा. कल्याणी पाटिल, प्रा. निकिता अग्रवाल, श्री बाचाते यानी कार्य केले.

विद्यार्थ्यांनी  मातीतून साकारला कामगार त्यांच्या जीवनात रांगोळीने आणला बहार

राजा रविवर्मा कलामंच ५ वर  मृदमूर्तिकला या प्रकारात एकूण २४ रांगोळी स्पर्धेत ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपली कला सादर केली . विद्यार्थ्यांनी साकारलेला कामगार हा विविध प्रकारचा होता. त्यामध्ये शेतीमध्ये काम करणारा शेतकरी, मूर्ती घडवणारा कुंभार, लाकडाचे काम करणारा सुतार, घर बांधकाम करणारा गवंडी, रोजी रोटी मिळवण्यासाठी रोज कामावर जाणारा मजूर, अशा विविध प्रकारचा कामगार विद्यार्थ्यांनी आपल्या मृदमूर्तिकलेतून साकारला.


व्यक्तीच्या जीवनात अर्थ आणि काम दोन्ही महत्त्वाचे आहे. काम केल्याशिवाय पैसा मिळत नाही आणि जीवन जगण्यासाठी पैशाची गरज लागते. आपलं जीवन उज्वल करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती कर्मनिष्ठ असतो. कामाशिवाय व्यक्तीचे जीवन अपूर्ण आहे. हेच विद्यार्थ्यांनी आपल्या मूर्ती कलेतून दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मग तो कामगार मजुर असो किंवा उच्च पदावर काम करणारा अधिकारी असो. प्रत्येकाला कामे करावीच लागतात .हा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या मृदमूर्तिकलेतून दिला.


        ‘अवघा रंग एकचि झाला’ विद्यार्थ्यांनी साकारल्या पारंपारिक सण उत्सवाच्या रांगोळी. व्यक्तीच्या, कामगाराच्या जीवनात रंग भरण्याचे काम हा निसर्ग करत असतो; पण प्रत्यक्ष जीवनात मात्र रंग आणण्याचे काम आपले हे पारंपरिक सण उत्सव करत असतात आणि सण उत्सवाला आपल्या घराच्या प्रांगणात साकार होते ते रांगोळी. सर्व रांगोळी कलाकार -विद्यार्थ्यांनी आपल्या विविध रंगातून वेगवेगळ्या धर्मातील सण- उत्सवाच्या रांगोळी काढून सर्वधर्मसमभावतेचा सामाजिक संदेश दिला. लोकांमध्ये सामाजिक जनजागृती होणे फार महत्त्वाचे आहे. असा संदेश देणारी रांगोळी विद्यार्थ्यांनी राजा रविवर्मा कलामंच ५यावर आपल्या कलेचे प्रदर्शन मृदमूर्तिकला व रांगोळी या ललितकलांच्या माध्यमातून साकारले.

कलावंताची होणारी घुसमट आणि स्त्रीशक्तीची प्रतीती एकांकिकेतून झाली सादर


 एकांकिका…पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना नेहमी कमी स्थान असते. त्यांच्यावर पुरुषी सत्ता आपल वर्चस्व गाजवत असते. परंतु स्त्रीने ठरवलं तर ती या सगळ्या बाबीवर मात करून आपल्या मनातील भीती दूर करू शकते. गोरगरीब वंचित, भिक मागून आपली उपजिविका भागविणाऱ्या कुटुंबाची स्वप्ने किती साधी असतात. दोन वेळेचे जेवण, कपडे, मुलाच बारस, शिक्षण, नोकरी, अशा प्रकारचे आशय एकांकिका मधून सादर करण्यात आले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सध्याचा  तरुण भौतिक सुखात व्यस्त झाला असून माणसा माणसांमधील संवाद कुठेतरी कमी होत चालला आहे. सध्याच्या या परिस्थितीमुळे मानसिक स्वास्थ्य कमकुवत होऊन नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे.
साप चावल्यामळे माणसाचा मृत्यू होत नसून त्याच्या मनातील भीतीमुळे मृत्यू होत असतो. साप उतरवणे किंवा चढवणे या सगळ्या भूलथापांना बळी पडत असलेल्या ग्रामीण भागातील नवीन पिढीकरिता शिकवण या एकांकिकेच्या माध्यमातून संदेश देण्यात आला. तरुणांनी शिक्षणाची कास धरून मोठे व्हावे, व अशा प्रथामध्ये अडकून आपले व समाजाचे भविष्य अंधारात नेऊ नये.
एकांकिका या प्रकारात एकूण संघांची नोंदणी झाली पैकी  6सादर झालेले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कॅम्पस नांदेड संदेश :- कलावंताच्या भावभावना, कलावंताच्या आयुष्यात होणारी घुसमट, कलावंताच्या समाज आणि शासनाकडून असणाऱ्या अपेक्षा, परिपूर्ण कलावंत होण्याच्या
सिद्धांत दिग्रस्कर, टिया परदेशी ,इशा बांगडे ,साक्षी शिंगणे ,कावेरी कौसडीकर ,प्रतीक इंगोले ,गौरी चौधरी ,सुदर्शन चिंतोरे, ग्रामीण महाविद्यालय नांदेड
संदेश :-  मुख्य  प्रवाहातून बाहेर पडलेला युवक, समस्यांच्या विळख्यात सापडलेला युवक, बेरोजगार युवक , नम्रता भगत,  प्रेम व नलवाढ ,  वैशाली शिलार अक्षता शिंदे, वैभव सौदागर, अतुल राक्षसे या कलावंतांनी सहभाग घेतला.