विलासराव देशमुख वैद्यकीय  महाविद्यालयातील अतिरिक्त लेखापाल संजय देशपांडे यांना मॅटने दिला मोठा दिलासा

औरंगाबाद,२० जानेवारी / प्रतिनिधी :-  लातूर येथील  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयातील अतिरिक्त लेखापाल संजय नंदकुमार देशपांडे मॅटने मोठा दिलासा दिला. मॅटचे न्‍या. व्‍ही.डी. डोंगरे व सदस्य बिजय कुमार यांनी देशपांडे यांच्‍या कार्यमुक्तीचे आदेश रद्द करुन त्‍यांना अतिरिक्त लेखपाल या पदावर नियुक्ती करुन त्‍यांचे थकित वेतन व सेवा सातत्‍य देण्‍याचे आदेश दिले. संजय देशपांडे यांच्‍यावर डॉक्टर महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा ठपका ठवून कार्यमुक्त करण्‍यात आले होते.

अतिरिक्त लेखापाल संजय देशपांडे यांनी अॅड. विकास कोदळे यांच्‍या मार्फत मॅटमध्‍ये याचिका दाखल केली होती. त्‍यानूसार, संजय देशपांडे यांच्‍यावर डॉक्‍टर महिलेने गौरवर्तन केल्याचा आरोप केला होता. प्रकरणात चौकशी समितीनेमून चौकशीला हजर राहण्‍याचे निर्देश देशपांडे यांना देण्‍यात आले होते. त्‍यानूसार देशपांडे यांनी समितीसमोर हजेरी लावून तोंडी व लेखी खुलासा केला. मात्र समितीने तो खुलासा नाकारुन २४ जून २०२१ रोजी देशपांडे यांना पदावरुन कार्यमुक्त केले. या आदेशा विरोधात देशपांडे यांनी मॅटमध्‍ये धाव घेतली.

प्रकरणाच्‍या सुनावणीवेळी अॅड. कोदळे यांनी देशपांडे यांना कोणत्‍याही बाबाची कायदेशीर पुर्तता न करता कार्यमुक्त केल्याचे न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणुन दिले. सुनावणीअंती मॅटने वरील प्रमाणे आदेश दिले.