देशात आतापर्यंत 30 लाख रुग्ण कोरोनामुक्त

कोविड 19 चाचण्यांमध्ये भारताने नवा उच्चांक कायम राखला

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2020

केंद्र सरकारच्या टेस्ट-ट्रॅक-ट्रीट धोरणातील उद्दिष्टांपैकी एक म्हणजे कोविडचा मृत्यूदर कमी करणे आणि रुग्णांची मृत्यूसंख्या आटोक्यात ठेवणे हा आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढता राहील याकडे विशेष लक्ष दिले जात असून त्यासाठी वैद्यकीय उपचारांचे प्रोटोकॉल पाळत सर्वांना एक प्रमाणित वैद्यकीय उपचार मिळतील यावर भर दिला जात आहे.

जागतिक सरासरीच्या तुलनेत भारतातील रुग्ण मृत्यू दर तर कमी आहेत आणि तो सातत्याने कमी होत आहे, (सध्याची आकडेवारी -1.74 %), त्यासोबतच, कोविड संसर्ग झालेल्या एकूण रूग्णांपैकी अगदी थोडे, म्हणजे 0.5% रुग्ण सध्या व्हेंटीलेटरवर आहेत. आकडेवारीनुसार, केवळ 2 टक्के रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून, 3.5 टक्यांपेक्षाही कमी रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्याची गरज आहे.

या  सर्व उपाययोजनांमुळे भारतातील कोविड-19 मधून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज 30 लाखांच्या (30,37,151)  वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासात देशभरातील 66,659 रुग्ण बरे झाले असून सलग आठव्या दिवशी दररोज 60000 रुग्ण बरे होण्याच्या विक्रमातील सातत्य भारताने कायम राखले आहे. कोविड-19 रुग्णांचा बरे होण्याचा दर आता 77.15% असून, गेल्या काही महिन्यांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचेच हे निदर्शक आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असतांनाच उपचाराखालील सक्रीय रुग्ण आहे बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येतील तफावतही वाढते आहे. आज ही तफावत 22 लाखांच्या पुढे गेली आहे. यामुळे सध्या देशात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या 8,31,124 इतकी आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रमाणात ही संख्या 21.11 टक्के इतकी आहे.

सलग दुसऱ्या दिवशी 11.70 लाखांहून अधिक नमुन्यांची चाचणी

प्रतिदिन 10 लाखांहून अधिक कोविड चाचण्यांचे ध्येय यशस्वीरित्या साध्य केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी कोविड 19 चाचण्यांमध्ये भारताने नवा उच्चांक कायम राखला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी देशभरात11.70 लाख नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात 11,69,765 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.

इतर कुठल्याही देशाने प्रतिदिन इतक्या मोठ्या प्रमाणात चाचण्या केलेल्या नाहीत.

इतक्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्यामुळे आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची एकूण संख्या 4.7 कोटी इतकी झाली आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांची संख्या 4,66,79,145 इतकी झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या होऊन देखील प्रतिदिन पॉझिटीव्हिटीचा दर 7.5% हून कमी आहे तर एकूण पॉसिटीव्हिटीचा दर 8.5 % हून कमी आहे.

केंद्र सरकारच्या टेस्ट, ट्रॅक, ट्रिट या धोरणाची बहुतेक राज्य/केंद्रशासित प्रदेशात यशस्वी अंमलबजावणी केल्यामुळे हा परिणाम दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या चाचण्यांमुळे रुग्णांमध्ये असलेली लक्षणे लवकर लक्षात येणे, तातडीने अलगीकरण, आणि वेळेवर उपचार सहज होत आहेत. गृह विलगिकरण आणि रुग्णालयात प्रमाणित उपचार नियमनावर आधारीत उपचार यावर लक्ष ठेवले जात असल्यामुळे मृत्युदर कमी होत आहे. 1 टक्क्यांहून कमी मृत्युदर हे लक्ष्य गाठताना सध्या चा मृत्यूदर 1.74 टक्के इतका असून त्यात घट होत आहे.

देशभरातील चाचणी प्रयोगशाळेच्या जाळ्यांमधील तितक्याच वेगवान विस्तारामुळे चाचणीतील ही वाढ देखील शक्य झाली आहे. भारतात आज 1631 प्रयोगशाळा देशभरात आहेत, 1025 प्रयोगशाळा या सरकारी क्षेत्रात आणि 606 खासगी प्रयोगशाळा आहेत. यातील समाविष्ट होणाऱ्यांमध्ये :

  • रिअल टाइम रॅपिड टेस्ट पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा 827 :  (शासकीय : 465 + खासगी :  362)
  • ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 683 (शासकीय : 526 + खासगी : 157)
  • सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा 121 : (शासकीय :  34 + खासगी 87)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *