जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवतीच्या अध्यक्षपदी शितल बरोटे व शहर अध्यक्षपदी प्रेरणा बनसोडे यांची नियुक्ती

जालना,२६सप्टेंबर/प्रतिनिधी :-माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश भैय्या टोपे यांच्या हस्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस युवतीच्या विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. यात जालना जिल्हाअध्यक्षपदी शितल बरोटे,उपाध्यक्षपदी पल्लवी महाले तर जालना शहर अध्यक्षपदी प्रेरणा बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली.
सोबतच जालना जिल्हा सोशल मीडिया अध्यक्षपदी मनीषा फड,जिल्हा सचिवपदी ज्योती चींढे, तालुका अध्यक्षपदी प्रेरणा पैठणे,तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी प्रीती साबळे व जालना तालुका सचिवपदी कु.मोनिका सावंत यांची नियुक्ती करण्यात आली.