लातूरजिल्ह्यातील रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत-पालकमंत्री अमित देश्मुख

लातूर,दि.15- जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. चांगले रस्त्यामुळे दळणवळण अत्यंत गतिमान होते. त्यामुळे सर्व अंतर्गत व बाह्य रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करावीत. शहरातील व बाहेरील रहदारी कमी करण्यासाठी मोठे पूल आणि रस्ते बांधण्यासाठी रस्ते विकास विभागाने तात्काळ आराखडा तयार करून सादर करावा, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांसकृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

येथील शासकीय विश्रामगृहातील आयोजित लातूर जिल्हा रस्ते विकास व लातूर जिल्हा पाट्बंधारे विकास आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता पी.के सिंह व अभियंता मुरलीदर चित्रीयेर्ला, सार्वजनिक बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता एस.जी गंगथडे, प्रोजेक्ट डायरेकटर सुनील पाटील, लघु पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता रुपाली ठोंबरे, जलसंपदा विभागातील अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख म्हणाले, रस्त्यांना त्यांच्या आवस्थेनुसार वर्गीकृत करून खराब रस्त्यांना तात्काळ दूरुस्त करावे .DEFECT LIABILITY PERIOD नुसार खराब रस्त्यांना तेंव्हाच दुरुस्त करणे अपेक्षित असते.त्यामुळे DLP चा अवलंब करून जिल्ह्यातील सर्व नादुरुस्त रत्यांना दुरुस्त करण्याचा मानस सर्व अधिका-यांनी दाखवणे गरजेचे आहे,जेणे करून नागरिकांना चांगले रस्ते देण्यात आपण यशस्वी होऊ शकतो.

पाटबंधारे विकास आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना पालकमंत्री श्री.देशमुख म्हणाले की पाटबंधारे विभागाने अद्ययावत तंत्राचा वापर करून बॅरेजेस मध्ये ऑटोमेटिक आणि संगणकीय प्रणालीवर चालणारे दरवाजे बसविण्यावर लक्ष घालावे,पोहरेगाव येथील उच्चपातळी बंधा-याचे दरवाजे तांत्रिक बिघाडामुळे उघडता आले नाही व परिणामी त्या भागातील शेतक-यांच्या उभ्या पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतक-यांचे नुकसान भरपाई साठी संबंधित विमा कंपन्यांना त्वरीत विम्याची रक्क्म अदा करण्यास संबंधित अधिका-यांनी पाठपुरावा करावा असे निर्देशही दिले.

शहराच्या सुशोभिकरणाचा भाग म्हणून विहिरींना पुनर्जीवित करण्याच्या दृष्टीकोनातून पाटबंधारे आणि महानगर पालिका यांनी संयुक्तरित्या प्रयत्न करून मासटर प्लान तयार करावा .तसेच जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत ज्याठिकाणी किंवा गावामध्ये बारामाही पाणी आहे अश्या गावांमध्ये बारा महिने पिण्याचे पाणी पुरवठ करण्याचे सूचित केले.तत्पूर्वी बैठकीच्या प्रारंभी अभियंता दिनानिमित्त भारतरत्न विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पालकमंत्री अमित देश्मुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *