सामुदायिक उपनयन संस्काराचे 3 एप्रिल रोजी जालन्यात आयोजन

जालना ,५ मार्च / प्रतिनिधी :- श्री.श्री. रविशंकर महाराज यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग जालना केंद्र व सकल ब्राह्मण समाज जालना यांच्या वतीने रविवार दि.3 एप्रिल रोजी  सामुदायिक  उपनयन संस्काराचे आयोजन महेश भवन,मंठा रोड जालना या ठिकाणी करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम बंगळुरु (कर्नाटक) येथील श्री स्वामी व ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. उपनयन सोहळ्यासाठी नाममात्र नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे. सर्व बटुंना सोवळे, उपरणे, होमकुंड,होम विधी सामग्री,तसेच या विधीसाठी लागणारे साहित्य समितीच्या वतीने देण्यात येणार आहे. प्रत्येक बटु सोबत 15 व्यक्तींची भोजन व्यवस्था समितीकडून करण्यात येणार आहे. यासाठी नोंदणी 15 मार्च पूर्वी करणे बंधनकारक आहे.

नोंदणीसाठी राधिका सचिन निंबोळकर 9922686789, राहुल जोशी मो.क्र.9325665939,अनंत वाघमारे मो.क्र.9403035879, अमित कुलकर्णी मो.क्र.9923359992 यांच्याकडे नाव नोंदणी करून सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगचे सुनील अग्रवाल,पुरोहित संघाचे अध्यक्ष विनायक महाराज फुलंब्रीकर, अ‍ॅड. बलवंत नाईक, सुनील किनगावकर, विलास नाईक, एस.व्ही. देशपांडे, सुरेश मगरे, सुनील जोशी, अ‍ॅड. सुरेश कुलकर्णी, अ‍ॅड. केशव नाईक, अनिल लोखंडे, सचिन निंबुळकर, संजय  देशपांडे, दीपक रणनवरे, आर.आर.जोशी, शालिणी पुराणिक, लक्ष्मीकांत कुलकर्णी, अरूणा फुलमामडीकर, सुनंद बदनापूरकर, विद्या कुलकर्णी, दीपा बिन्नीवाले, आनंदी अय्यर, शशिकांत दाभाडकर, सुमितमहाराज कुलकर्णी, गणेश लोखंडे, संकेत मोहिदे, अमोल पाठक, शुभम कौडगावकर, अमर पवार, शशिकांत दाभाडकर, संतोष जोशी, विनोद कुलकर्णी, अनिल खलसे, गणेश भोसले, रूचिता सेवलीकर, अपर्णा राजे, जान्हवी वैद्य यांच्यासह संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.