दोन वर्षापासुन ऑनलाईन मोबाईलवर शिक्षण घेणारे बारावीचे विद्यार्थी परीक्षेला

फुलंब्री,५ मार्च / प्रतिनिधी :- वर्षभर घोकंपट्टी करुन व गेले दोन वर्षापासुन ऑनलाईन मोबाईलवर शिक्षण घेत आपल्या करीअरची दिशा ठरविणारा बारावीचे विद्यार्थी शुक्रवार (  4 मार्च ) परीक्षेस सामोरे गेले. वर्षभर अभ्यास, सराव चाचणी, आदींचे नियोजनपुर्वक आराखडा  प्राध्यापकांचे ऑनलाईन मोबाईलवर मार्गदर्शन आदीतुन विद्यार्थ्यांच्या वाटा या परीक्षेतुन वेगळ्या होणार आहेत.

Displaying IMG-20220304-WA0025.jpg

तालुक्यात शुक्रवारी बारावीची परीक्षा सुरु झाली. यंदा प्रथमच होम सेंटर होते. त्यामुळे परीक्षेेेेला येण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ झाली नाही तसेच परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडु नये,  यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तालुक्यासह इतर ठिकाणचे फुलंब्री कस्टोडीयन अंतर्गत 15 केंद्र व 30 उपकेंद्र परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेस शांततेत सुरुवात झाली. इंग्रजीचा पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे ओझे असल्यासारखे  दिसुन आले.

या परीक्षा केंद्र व केंद्रात परीक्षेस एकुण 5 हजार 700 विद्यार्थी परीक्षेस बसलेले होते त्यापैकी 5 हजार 650 विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला. कुठेही कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. तहसिलदार डॉ.शितल राजपुत तसेच गटविकास अधिकारी ज्योती कवडदिवे यांनी फुलंब्री परीक्षा केंद्रास भेट दिली तर गटशिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी खामगाव परीक्षा केंद्रास भेट दिली.