जालना पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या जंगलात भीषण आग लागून 20 एकरातील झाडे जळून खाक

जालना,२५ मार्च /प्रतिनिधी :- जालना शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या जंगलात भीषण आग लागून 20 एकरातील झाडे जळून खाक झाली आहेत. 

Displaying IMG-20220325-WA0042.jpg

जालन्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात जंगलातील जमीनीवरील गवताळ  झाडांना . दि.25 शुक्रवार रोजी दुपारच्या सुमारास ही आग लागल्याचे लक्षात आले  आग कशामुळे लागली याचं कारण अजून समोर आलेलं नाही.घटनेची माहिती मिळताच बाजूलाच असलेल्या पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनी व अग्निशमन दलाने  आग विझवण्यास सुरुवात केली.उन्हाच्या कडक्यामुळे आग भडकली हजारो झाडे जळून खाक झाली आहेत.आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी टँकरने पाणी मारून आग विझवण्याचा अटोकाट प्रयत्न करण्यात आला.

आर.पी. टी.एस.पोलिस प्रशिक्षण केंद्र जालना येथील सर्वे न. 201 मध्ये अंदाजे 20 एकर जंगलातील खुल्या मैदानातील गवत असल्याने ही आग वेगाने पसरत गेली.आग विझवण्यासाठी अग्निशमन दालाचे 3 बंब लागले तर पोलिस प्रशासनाने  टँकरने आग विझवण्यास मदत केली.दुपारी 12 वा. दरम्यान लागलेली आग 3:30 दरम्यान आटोक्यात आली.या आगी मध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली  नाही.

Displaying IMG-20220325-WA0045.jpg


नगर पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे यांनी घटनास्थळी भेट दिली.अग्निशमन दलाचे फायरमन नितीश ढाकणे, संदीप दराडे, अशोक गाढे, नागेश घुगे, अब्दुल बाशिद, किशोर सगट, रवी बनसोडे,  वाहनचालक संजय हिरे, अशोक वाघमारे, पंजाबराव देशमुख यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे परिश्रम घेतले.

Displaying IMG-20220325-WA0046.jpg

सामाजिक सेवाभावी संस्थांच्या सहकार्यातून हे जंगल विकसित

पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांकडून या परिसरात वृक्षारोपण व जलसंवर्धनाची कामे करण्यात येतात. प्राचार्य चव्हाण यांनी अतिशय परिश्रमपूर्वक शहरातील समस्त महाजन ट्रस्ट, 100 ₹ सोशल क्लब या  सामाजिक सेवाभावी संस्थांच्या सहकार्यातून हे जंगल विकसित केले आहे. त्यातील मोठा भाग जळून खाक झालाय. सिंदखेडराजा,देऊळगाराजा रस्त्यावरील वन विभागाच्या जंगलात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या भागात लाकूड तोड व जंगलातील प्राण्यांच्या शिकारी केल्या जातात.