जालना जिल्ह्यात 66 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि. 2 :-जालना जिल्ह्यात 66 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-7593असुन सध्या रुग्णालयात-515 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2890, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-65 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-13482 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-66 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-2335 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-10944, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-440 एकुण प्रलंबित नमुने-114, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2399.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-38, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-2387, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-431,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-36, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-515,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-115,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-49, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1555, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-707 (19 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-25654 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-73 एवढी आहे.

सुरगी नगर अंबड येथील रहिवाशी असलेल्या 55 वर्षीय पुरुष रुग्णास हृदयविकाराचा झटाका आल्यामुळे व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि.31 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 1 ऑगस्ट 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 2 ऑगस्ट 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 201 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, 880 वाहने जप्त, 1059 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आ. पी. सी. 188 प्रमाणे न्यायालयाने ठोठावलेला दंड 1 लाख 7 हजार,मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 7 लाख 87 हजार 230 असा एकुण 9 लाख 21 हजार 38 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *