डॉ.न्यानिशा देसाई यांनी पटकावला मिसेस इंडियाचा सन्मान

जालना ,२४ सप्टेंबर /प्रतिनिधी :-यंदा मिसेस इंडिया एम्पावर २०२३ ग्रँड फिनाले स्पर्धा जी इव्हेंट आर्किट हाॅटेल पुणे येथे  झाली.या स्पर्धेत २५ते ४० वयोगटात भोसरी डॉक्टर असोसिएशनच्या सभासद  तसेच जालना जिल्ह्याच्या कन्या डॉ.न्यानिशा देसाई यांनी मिस इंडिया एम्पावर २०२३ हा किताब जिंकला.डाॅ.न्यानिशा देसाई या जालना येथील प्रा.पंढरीनाथ सारखे व माजी प्राचार्या अपर्णा पवार यांच्या त्या कन्या आहे.

डॉ .न्यानिशा देसाई यांनी या स्पर्धेसाठी ऑडिशन  दिले व त्यांची निवड  झाली .या सन्मानाच्या मानकरी होण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली.या साठी वडील प्रा.पंढरीनाथ सारखे  व आई प्राचार्य अपर्णा पवार यांनी डॉ.न्यानिशा यांना भरपूर पाठिंबा दिला.डाॅ.न्यानिशा देसाई यांच्या दैदिप्यमान यशाबद्दल मुद्रा साहित्य सेवा संस्थेच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक रमेश देहडकर,कैलास भाले, सुनील लोणकर, मनीष पाटील, शिवाजी तेलंगे सुधाकर वाहुळे,रसना देहेडकर, डॉ.प्रभाकर शेळके यांनी अभिनंदन केले