रामनगर महामार्गावरील सिंधी काळेगाव फाट्यावर चाऱ्याला आग, मोठं नुकसान

Displaying IMG-20220303-WA0029.jpg

जालना ,३ मार्च / प्रतिनिधी :-जालना ते रामनगर महामार्गावरील सिंधी काळेगाव फाट्यावर शेतातून काढून ठेवलेल्या तुर, भुसा आणि जनावरांच्या चाऱ्याला आग लागून मोठं नुकसान झालं. दुपारी दीड वाजे दरम्यान अचानक रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या ढिगाऱ्यातून अचानक धूर निघत असल्याचे निदर्शनास आले.

Displaying IMG-20220303-WA0025.jpg

गावकऱ्यांनी हंडा आणि बकिटीच्या माध्यमातून सदर आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने तात्काळ घटनस्थळी धाव घेत आग विझविली.याआगी मध्ये आत्माराम गिराम आणि राम शेळके यांची सोंगलेली तूर, जनावरांचा चारा, मका आणि सोयाबीन भुसा, कडबी सह सुमारे 80 हजाराचा नुकसान झाला. तर शेजारी असलेली कापूस, ज्वारी ची पिके आगीपासून वाचल्याने अधिकचा नुकसान टळला.अग्निशमन विभागाचे फायरमन नितेश ढाकणे, सागर गडकरी, विठल कांबळे, अशोक गाढे आणि वाहनचालक बाबुराव गवळी यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.