मेव्‍हणीवर वारंवार बलात्‍कार करुन तिला गर्भवती करणाऱ्या नराधम मेव्‍हण्‍याला मरेपर्यंत जन्‍मठेप

औरंगाबाद,३ मार्च / प्रतिनिधी :- शिक्षणासाठी भाऊजीच्‍या घरी आलेल्या १३ वर्षीय मेव्‍हणीला जीवे मारण्‍याची धमकी देत तिच्‍यावर वारंवार बलात्‍कार करुन तिला गर्भवती करणाऱ्या  नराधम मेव्‍हण्‍याला मरेपर्यंत जन्‍मठेप आणि विविध कलामांखाली सहा हजारांच्‍या दंडाची शिक्षा जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश डॉ. एम.एस. देशपांडे यांनी गुरुवारी दि.३ मार्च रोजी ठोठावली. विशेष म्हणजे गुन्‍हा दाखल झाल्यापासून नराधम भावजी फरार झाला होता. चार वर्षांनंतर तो पोलिसांना शरण आला. तेव्‍हा पासून ते शिक्षा होईपर्यंत नराधम भावजी हा कारागृहात आहे.

प्रकरणात १३ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली. त्‍यानूसार, पीडिता ही शिक्षण घेण्‍यासाठी गावावरुन बहिणा व भाऊजीच्‍या घरी राहण्‍यासाठी आली होती. पीडितेची बहिण ही कंपनीत कामाला होती तर नराधम भाऊजी हा भाजी-पाला विक्रीचा व्‍यवसाय करित होता. दरम्यान एकेदिवशी पीडितेची बहिणा नेहमी प्रमाणे कंपनीत कामाला गेली होती. पीडिता ही घरात भांडी घासत असताना नराधम तेथे आला त्‍याने पीडितेवर बळजबरी करण्‍याचा प्रयत्‍न केला असता पीडितेने मोठ्याने ओरडून त्‍याच्‍या हाताला चावा घेतला. नराधमाने पीडितेचे तोंड दाबून पीडितेवर बळजबरी बलात्‍कार केला. पीडितेने ही बाब बहिणीला सांगते असे म्हणाली असता नराधमने शिक्षण बंद करुन तुझ्या बहिणीला देखील जीवे मारीन अशी धमकी दिली. त्‍यानंतर आरोपीने वारंवार पीडितेवर बलात्‍कार केला. नराधमाने या घटनेच्‍या महिन्‍याभरापूर्वी देखील पीडितेवर बलात्‍कार केल्याचे पीडितेने जबाबात म्हटले आहे.

४ जुलै २०१३ रोजी पीडिता तिची बहिण व तिच्‍या मैत्रिणी असे केंब्रीज शाळेजवळील एका मंदीरात गेल्या होत्‍या. त्‍यावेळी पीडितेला अचानक चक्कर आली. त्‍यानंतर पीडितेच्‍या बहिणीने पीडितेला घरी आणले. पीडितेची प्रकृती ठीक नसल्याने तिला रुग्णालयात घेवून जाऊ असे पीडितेच्‍या बहिणीने नराधमाला सांगितले. त्‍यावर नराधमाने तु तीला रुग्णालयात घेवून चल मी नंतर येतो असे म्हणत वेळ मारुन नेली. पीडितेची बहिण पीडितेला रुग्णालयात घेवून गेली. संधी साधत नराधमाने घरातील दागिने व रोख रक्कम घेवून घरातून पळ काढला. तर रुग्णालयात पीडिता ही १८ आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. बहिणीने पीडितेकडे चौकशी केली असता, नराधमने हे कृत्‍य केल्याचे तिने सांगितले. १३ जुलै २०१३ रोजी पीडितेला घाटी रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. उपचार सुरु असतांना पीडितेच्‍या गर्भातील अर्भक मृत असल्याने गर्भ काढण्‍यात आला. प्रकरणात मुकुंदवाडी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

प्रकरणात तपासा अधिकारी तथा तत्‍कालीन गुन्‍हे शाखेच्‍या विशेष शाखेच्‍या उपनिरीक्षक ए.पी. भांगे यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणी वेळी, सहायक लोकाभियोक्ता उल्हास मा. पवार यांनी यांनी १७ साक्षीतदारांचे जबाब नोंदवले. विशेष म्हणजे फिर्यादीच गुन्‍ह्यात फितुर झाली. त्‍यानंतरही अर्भकाची करण्‍यात आलेली डीएनए चाचणी आणि परिस्थिती जन्‍य पुराव्‍या आधारे न्‍यायालयाने आरोपीला दोषी ठरवून त्‍याला भादंवी कलम ३७६ (२)(i) आणि कलम ३७६ (२)(एन) मरेपर्यंत जन्‍मठेप आणि प्रत्‍येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे पीडितेला नुकसान भरपाई म्हणुन दंडाची रक्कम आणि पोक्सोच्‍या कायद्याअंतर्गत नुकसान भरपाई देण्‍याचे आदेश देखील विधी व सेवा प्राधिकरणाला दिले.

ल्‍हास पवार यांचे कौतूक

Displaying WhatsApp Image 2022-03-03 at 7.33.35 PM.jpeg

सहायक लोकाभियोक्ता उल्‍हास पवार यांनी अशा किचकट प्रकरणात पीडिता ही फितुर होऊनही, केवळ परिस्थिती जन्‍य आणि अन्य पुराव्यां आधारे गुन्‍हा सिध्‍द करुन आरोपीस मरेपर्यंत जन्म ठेपेची आणली. याबद्दल महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम व जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी उल्‍हास पवार यांचे कौतूक करुन सत्‍कार केला.