केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या भाजपा स्थापनादिनी शुभेच्छा

जालना,७ एप्रिल / प्रतिनिधी :- केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री तसेच भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी आज भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा एका व्हिडीओ द्वारे दिल्या आहेत. आज ०६ एप्रिल म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस, मला स्वतःला अभिमान आहे की मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. या देशात सर्वात जास्त खासदार आणि सर्वात जास्त आमदार या देशात भारतीय जनता पार्टीचे आणि दहा कोटी सदस्य या पक्षाचे आहेत त्या पक्षाचा मी सदस्य आहे याचा मला स्वतः अभिमान आहे. ज्या कार्यकर्त्यांनी आणि महापुरुषांनी आपले रक्त आणि  घाम घाळून भाजपचा वटवृक्ष बनवला त्या सर्वांना मी प्रणाम करतो. भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजप ही अशी संघटना आहे जिच्या सदस्य साठी पक्ष हाच परिवार आहे. राष्ट्रवादी विचारधारा, अंत्योदयाची तत्वे यावर आपला देश मोदीजींच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करत आहे. भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने मी सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त संख्येने भारतीय जनता पक्षामध्ये जनतेला येण्याचे आवाहन करावे अशी विनंती करतो. अशा शब्दांत दानवे यांनी व्हिडीओतून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.