बॅनर लावण्याचा कारणावरून झालेल्या वादातून रामनगरात गोळीबार

एक जण जखमी गंभीर जखमी

जालना ,३ मार्च / प्रतिनिधी :- जालना तालुक्यातील रामनगर परिसरात शिवसेना कार्यकर्ता शिवाजी शेजुळ आणि रमेश जोशी यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये  रोड वर बॅनर लावण्याचा कारणावरून झालेल्या वादातून गोळीबार झाला.

शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांचे  दोन गट आमने सामने आल्याने मोठा वाद झाल्याची घटना घडली या वादात रमेश जोशी यांनी शेजुळ गटाच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार केला.यात एक जण जखमी गंभीर जखमी आहे   घटनेची माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी दाखल झाली असून परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावर निर्माण झाले आहे.

Displaying IMG-20220303-WA0031.jpg


जोशी यांच्या बॅनर लावण्याच्या कारणावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून रात्री जोशी यांनी बॅनर लावण्याच्या केलेल्या विरोधात नंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह गावातील जमाव जोशी यांच्याकडे चालून आल्याने या दोन गटात वाद झाला.या वादात जोशी गटाच्या गणेश जोशी यांनी गोळीबार केल्याने विजय ढेगळे हा 22 वर्षीय तरुण पोटात गोळी लागल्याने जखमी झालाय,त्याला पोलिसांनी तात्काळ जालन्यातील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचरासाठी दाखल केल्याची माहिती मोजपुरी पोलिसांनी दिली.  पुढील उपचारासाठी जखमी तरुणास औरंगाबाद येथे हलविण्यात आल्याचे वृत्त आहे.

Displaying IMG-20220303-WA0030.jpg

या घटनेने संपूर्ण परिसरात तणावाचे वातवरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आलाय.
दरम्यान पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोन्ही गटातील लोकांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.