राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन

जालना ,३० जानेवारी /प्रतिनिधी :-जगाला अहिंसा, सत्याग्रह आणि शांतीचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी काँग्रेस जणांनी त्यांचे स्मरण करून अभिवादन केले. ईश्‍वर, अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान हे भजन गावून गांधीजींच्या विचाराचा संदेश पोहचविला.

Displaying IMG-20220130-WA0049.jpg


जालना जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जुना जालना गांधी चमन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रपिता महात्मा गांधीकरण्यात आले. जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी अ.भा.कॉ. सदस्य भिमराव डोंगरे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा विमलताई आगलावे यांनी पुष्पांजली अर्पण करून आपले विचार व्यक्त केले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी अभिवादनपर बोलतांना सांगीतले की, देशामध्ये काही जातीयवादी मंडळी महात्मा गांधी यांच्या विचाराचा देशाला विसर पडावा म्हणून चुकीचे विचार देशासमोर आणि विशेषतः तरूणांसमोर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. ही बाब देशासाठी घातक असल्याचे श्री देशमुख म्हणाले. तरूणांनी या जातीवादी मंडळीचा बिमोड करून देशाची एकात्मता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी थोर पुरूषांचे विचार आत्मसात करून देशाला बलशाली बनविण्यासाठी पुढे यावे असेही त्यांनी सांगीतले.
यावेळी शाहिर गुलाबराव नळणीकर व त्यांच्या पथकाने पुण्यतिथीनिमित्त गांधी यांचे थोर विचार गीत आणि भजनाच्या माध्यमातून यावेळी मांडले.
संगत करावी सदा सज्जनांची
सावली नसावी दुर्जनांची
रघुपती राघव राजाराम
पतीत पावन सिताराम
ईश्‍वर, अल्लाह तेरो नाम
सबको सन्मती दे भगवान
असे विविध गीत आणि भजन शाहिर नळणीकर यांनी मांडून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विमलताई आगलावे, अंकुश राऊत, सुषमाताई पायगव्हाणे, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, डॉ. विशाल धानुरे, जावेद बेग, नंदाताई पवार, शेख रफीक, वैजिनाथ डोंगरे, शेख शमशोद्दीन, सय्यद अजहर, शेख शकील, चंदाताई भांगडीया, संगीता कांबळे, मोहन इंगळे, नारायण वाढेकर, किशन जेठे,  फकीरा वाघ, सुभाष कोळकर, ज्ञानेश्‍वर माऊली, चंद्रकांत रत्नपारखे, रहिम तांबोळी, सय्यद करीम बिल्डर, योगेश पाटील, बाबासाहेब सोनवने, जावेद कुरेशी, संतोष अन्नदाते, कलीम खान, गणेश चांदोडे, इम्रान बिल्डर, जावेद अली आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता गांधी चमन परिसरात प्रभात फेरी काढून करण्यात येवून महात्मा गांधी अमर रहे अशा गगनभेदी घोषणा देण्यात आला.