नियोजित सावरकर भवन वास्तूच्या अध्यक्षपदी महेंद्र देशपांडे यांची निवड

जालना ,२४ सप्टेंबर /प्रतिनिधी :- इंजि.एस.एन.कुलकर्णी यांनी स्वतः ची २८०० चौरस फुटाची जागा स्वातंत्र्यवीर सावरकर भवन साठी दान केली. या जागेवर सावरकर भवन निर्माण करण्यात येणार असून या जागेत एक सभागृह व मुलींचे वसतिगृह व्हावे अशी इच्छा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. त्यांची ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून सावरकर प्रेमींची आज ब्राह्मण सभा भवन येथे कल्याणराव देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली.

या बैठकीत सावरकर भवन निर्मितीच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक महेंद्र देशपांडे यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच उर्वरित कार्यकारिणीची निवड अध्यक्ष हेच करतील असे ठरले.या बैठकीत डॉ.सुभाष भाले,विनीत साहनी,खुशाल ठाकूर,सुनील जोशी, ॲड.बळवंत नाईक डॉ.संजय रुईखेडकर यांनी उपयुक्त सूचना व मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात एस.एन.कुलकर्णी अत्यंत भाऊक झाले,त्यांनी यासाठी कसे प्रेरित झालो याचे उदाहरण दिले.१९५३ बुलढाणा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर गुरुजी आले असता त्यांच्या चरणाचा स्पर्श करण्याचे भाग्य मला लाभले. हे भवन साकारताना मी असेल किंवा नसेल याची सर्वस्वी जवाबदारी तुमची असेल असे विषद करताना सर्वांना गहिवरून आले.
या बैठकीस विनीत सहानी,अभय साहनी,श्रीकांत शेलगावकर, अशोक देशमुख,अरुण देहेडकर, रमेश देहेडकर, संदीप जिगे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते, या बैठकीचे सूत्र संचालन एम जी.जोशी यांनी केले.