खुलताबाद उर्स कालावधीत वाहतुक मार्गात बदल

छत्रपती संभाजीनगर, दि.21(जिमाका)- खुलताबाद शहरात दि.21 सप्टेंबर ते दि.5 ऑक्टोबर या कालावधीत जर-जरी-जर बक्ष उर्स असून या उर्ससाठी लाखो भाविक खुलताबाद येथे येतात. त्यामुळे खुलताबाद शहरानजिक सोलापुर धुळे रा.म.क्र.52 वरील रहदारी सुरळीत सुरु राहण्यासाठी दि.21चे रात्री 12 ते दि.5 ऑक्टोबरचे रात्री 12 वाजेपर्यत यामार्गाने जाणारी सर्व जड अवजड वाहतुकीच्या मार्गात खालीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे.

फुलंब्री-मार्गे खुलताबाद-कन्नड कडे जाणारी सर्व जड वाहने छत्रपती संभाजीनगर, शरणापुर फाटा, माळीवाडा, कसाबखेडा फाटा, नांदगाव मार्गे धुळे कडे जातील.

फुलंब्री कडुन उर्सासाठी येणारी सर्व जड वाहणे काटशेवरी फाटा, ममनापुर, भडजी, सराई मार्गे खुलताबाद शहरात येतील.

छत्रपती संभाजीनगर मार्गे येणारी सर्व जड वाहतुक ही, शरणापुर फाटा, माळीवाडा, कसाबखेडा फाटा, नांदगाव मार्गे धुळे कडे जातील.

छत्रपती संभाजीनगर शहरातुन उर्सासाठी येणारी सर्व हलके वाहने हे छ.संभाजीनगर, दौलताबाद, दौलताबाद घाट मार्गे खुलताबाद शहरात येतील.

तसेच या कालावधीत सर्व जड वाहनाची वाहतुक दौलताबाद टी पॉईट पासून दौलताबाद घाट, कागजीपुरा ते वेरुळ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी निर्गमीत केले आहेत.