सार्वजनिक न्यास नोंदणी संस्थांनी दोन हजारांच्या चलनी नोटा मुदतीत बदलवून घ्या अथवा बॅंकेत जमा करा-धर्मदाय उपायुक्त

छत्रपती संभाजीनगर,२१ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  रिजर्व बॅंकेने दोन हजार रुपये मुल्याच्या नोटा चलनातून काढण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बदलवण्यासाठी दि.30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत असून अर्व सार्वजनिक अन्यास नोंदणी कार्यालयाअंतर्गत नोंदणीकृत संस्थांनी त्यांच्या ताब्यातील दोन हजार रुपये मूल्य असलेल्या चलनी नोटा बदलवून घ्या अथवा खात्यात जमा करा,असे आवाहन धर्मदाय उपायुक्त प्रणिता श्रीनिवार यांनी केले आहे.सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अंतर्गत नोंदणीकृत न्यास, संस्था, ट्रस्ट,जिल्हाभरातील न्यास/मंदीर संस्थांचे पदाधिकारी यांनी मंदिरात दानपेटी वा इतर माध्यमातून प्राप्त झालेल्या दोन हजार रुपयांच्या चलनी नोटांचा भरणा मुदतीच्या आत बँकेत भरणा करावा. तसेच मुदतीच्या आत दानपेटी उघडून त्यात प्राप्त  नोटा बँकेत जमा करा व संभाव्य नुकसान टाळावे,असे कळविण्यात आले आहे.