आज दिनांक आता व्हॉट्सॲप चॅनेलवर;व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करण्याचे आवाहन 

छत्रपती संभाजीनगर :-आज दिनांक हे  जनतेशी थेट व्हॉट्सॲपवरून जोडले गेले आहेत. काल गणेश चतुर्थीच्या दिवशी ‘आज दिनांक ’ या व्हॉट्सॲप चॅनेलचा शुभारंभ करण्यात आला आहे.आज दिनांक हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या.काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. या व्हॉट्सअप चॅनेलच्या माध्यमातून आता थेट जनतेपर्यंत पोहोचणार आहे.

समाजातील संवाद माध्यमांमध्ये नवीन तंत्रज्ञानानुसार वेगाने बदल होत असून  सर्वसामान्यांचे संवादाचे प्रभावी माध्यम ठरलेल्या ‘व्हॉट्सॲप’ने चॅनलच्या माध्यमातून संवादाचा नवीन मार्ग उपलब्ध करून दिला आहे.

सोबत दिलेल्या दुव्यावरून आपल्या या चॅनेलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले  आहे. या चॅनेलवरून सोप्या पद्धतीने सर्व अधिकृत माहिती जनतेला थेट हातातील स्मार्टफोनवर मिळणार आहे.

या व्हॉट्सअप चॅनेलला केवळ स्वतःच्या व्हॉट्सअपवरून फॉलो करायचे आहे. त्यासाठी कुठलीही नोंदणी करण्याची आवश्यकता नसून आपला व्हॉट्सअप क्रमांकही व्हॉटसअपकडून गुप्त राखला जातो. शिवाय एका व्हॉट्सअप चॅनेलला किती लोकांनी फॉलो करावे यावरही व्हॉट्सअप ग्रुपसारखे काही बंधन नाही. त्यामुळे व्हॉट्सअप चॅनेल हे अधिक मुक्त, स्वतंत्र आणि प्रभावी असे लोकप्रिय संवाद माध्यम ठरेल, असे संपादक प्रमोद माने  यांनी सांगितले.

चॅनेलला असे करा फॉलो :

व्हॉटसॲपवरील ‘अपडेट्स’ मेनूमध्ये गेल्यावर तिथे चॅनेल विभागात हे चॅनेल आहे. त्याला क्लिक करुन फॉलो केले की तुम्हाला सर्व अपडेट्स विनासायास उपलब्ध होणार आहेत. https://whatsapp.com/channel/0029Va5OJIW5kg7FC6hRcG0E या लिंकवर व्हॉटसॲपधारकांनी क्लिक केल्यास ‘आज दिनांक ’ या चॅनलला फॉलो करता येणार आहे.