राज्य सरकारच्या जुलमी राजवटी विरुद्ध लढणार- शिवसेना नेते आदित्य ठाकरे

छत्रपती संभाजीनगर,१५ सप्टेंबर /प्रतिनिधी :- सध्याचे गद्दार सरकार नुसत्या भुलवणाऱ्या घोषणा करत असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना एकाही योजनेचा लाभ मिळत नाहीय.राज्य सरकारच्या जुलमी राजवटी विरुद्ध आगामी काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याची ग्वाही शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिली.

यावेळी शिवसेना नेते संजय राऊत,चंद्रकांत खैरे,विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,आ. उदयसिंह राजपूत,जळगाव संपर्कप्रमुख संजय सावंत,उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात व तालुकाप्रमुख आनंद भालेकर उपस्थित होते.

वैजापूर मतदार संघातील मुद्देशवाडगांव येथील शेतकऱ्यांसोबत शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांच्यासमवेत आज संवाद साधला.नुकसान अनुदान व पिक पंचनाम्यासाठी केवायसी ही पद्धत शासनाने सुरू करून शेतकऱ्यांवर विविध बंधने लागू केली आहेत. शेतकरी बांधवांच्या हक्काच्या मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या या पद्धतीला बंद करण्यात यावे अशी मागणी यावेळी केली.