जम्मू- काश्मीरातील शहीद जवानांना  शिवसेना (उबाठा) च्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली जाणार

छत्रपती संभाजीनगर,१५ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जम्मू काश्मीर मध्ये अतिरेकी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय लष्कराच्या जवानांना शिवसेना (उबाठा) संभाजीनगर शाखेच्या वतीने शनिवार सकाळी ठीक १०.३० वाजता क्रांती चौक येथे श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहेत.यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत व चंद्रकांत खैरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिली.  

या कार्यक्रमास उपजिल्हा,शहर, तालुका,उप तालुका, उपशहर, विभाग, उपविभाग, शाखा प्रमुख, संघटक,महिला, युवासेना,अंगीकृत संघटना, आजी माजी पदाधिकारी  लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, किशनचंद तनवाणी व राजेंद्र राठोड यांनी केले आहे.