वैजापूर येथे होणाऱ्या सदगुरू गंगागिरी महाराज यांच्या सप्ताहानिमित्त पदाधिकाऱ्यांची शहरातून फेरी

सप्ताहसाठी  मदत व सहकार्य करण्याचे व्यापारी व नागरिकांना आवाहन

वैजापूर,२२ जुलै /प्रतिनिधी :- वैजापुर येथे 21 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सदगुरू गंगागिरीजी महाराज यांच्या 176 व्या अंखंड हरिनाम सप्ताह निमित्त सप्ताह कमिटीचे अध्यक्ष आ.रमेश पाटील बोरणारे, कार्याध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, उपाध्यक्ष साबेर खान, बाळासाहेब संचेती यांनी शनिवारी (ता.22) शहरात फिरून बाजारपेठेतील व्यापारी व नागरिकांची भेट घेतली व सप्ताहाची माहिती दिली तसेच सप्ताह साठी सहकार्य व मदत करण्याचे आवाहन केले.

यावेळी सप्ताह कमिटीचे सचिव बाबासाहेब पाटील जगताप, बाजार समितीचे सभापती रामहारी जाधव, जेष्ठ नेते खुशालसिंग राजपुत, शिवसेनेचे तालुका प्रमुख रांजेद्र पाटील सांळुक,  शहरप्रमुख पारस पाटील घाटे, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश  राजपुत यांच्यासह  सर्व सप्ताह कमेटीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.