वैजापूर भाजपतर्फे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

वैजापूर,२२ जुलै /प्रतिनिधी :-  राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या जन्मदिवसानिमित्त वैजापूर विधानसभा प्रमुख तथा नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.  

या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत नगरसेवक शैलेश चव्हाण, गणेश खैरे, गोकुळ भुजबळ, राजेश गायकवाड, बजरंग मगर, प्रेम राजपूत, शैलेश पोंदे, जितू पवार, सोमू सोमवंशी, सचिन दाढे, गिरीश चापानेरकर, सन्मित खनिजो, विशाल शिंदे, कल्याण काळे उपस्थित होते. यावेळी आवयव दान व नेत्रदान यांचे फॉर्म भरून घेण्यात आले.