भाजपच्या समर्थ बूथ अभियानांतर्गत लासुर सर्कल मधील बूथ अध्यक्ष व शक्तिकेंद्रप्रमुखांची आढावा बैठक

वैजापूर ,२९ ऑक्टोबर /प्रतिनिधी:- भाजपच्या समर्थ बूथ अभियानांतर्गत वैजापूर तालुक्यातील लासुर सर्कलमधील पक्षाच्या बूथ अध्यक्ष व शक्तिकेंद्रप्रमुख यांची आढावा बैठक बुधवारी करंजगाव येथे पार पडली.या बैठकीस बूथ प्रमुखांची शंभर टक्के उपस्थिती होती. 
या आढावा बैठकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव, जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे आदींनी बूथ अध्यक्ष व शक्ति केंद्रप्रमुख यांना मार्गदर्शन केले. तालुकाध्यक्ष दांगोडे यांच्याहस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा भेट देऊन बूथ अध्यक्ष व शक्ती केंद्रप्रमुखांचा सत्कार करण्यात आला.

Displaying IMG-20211029-WA0011.jpg


या आढावा बैठकीस भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते तथा जिल्हा दूध संघाचे संचालक कचरू पाटील डिके, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर पाटील जगताप,राजेंद्र चव्हाण,संजय आंबेकर,युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष अनिल वाणी,प्रतापसिंग मेहेर,सरपंच सतीश रावते,मोहन उगले,जेष्ठ कार्यकर्ते बिपीन साळे, डॉ.प्रकाश वाघ,भीमसिंग कहाटे,संतोष आवारे,सुनील पगार,सचिन घोडजे,अब्बास मिर्झा,दिलीप कुलकर्णी, विकास कदम यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.