खंडाळा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पर्यावरण फेरी काढून जनजागृती

वैजापूर,२२ जुलै /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे नैसर्गिक साधन संपत्ती जपण्यासाठी व शालेय विद्यार्थ्यांत पर्यावरण जागृती व्हावी यासाठी जनजागृती करण्यात आली.

निसर्गाने आम्हाला भरभरून दिलेले आहे, पण आम्ही ते सर्व  गिळंकृत करून स्वतःचे प्राण व वन्य प्राणी जीवन यांचे अस्तित्व धोक्यात आणत आहोत. यासाठी निसर्गी आहे ते कायम ठेवून त्याची जपवणूक संवर्धन व संरक्षण करणे, मोठ्या प्रमाणात झाडे लावणे, वाढते ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण थांबविणे यासाठी सर्व स्तरावर विशेषतः शालेय स्तरावर सर्वंकष प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. असे प्रतिपादन स्वच्छतादूत व माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे आयोजित कार्यक्रमात बोलतांना केले.

निर्मला इन्स्टिट्यूट वैजापूर या सामाजिक संस्थेने पर्यावरण जनजागृती, वृक्षारोपण, स्वच्छता, “पाणी आडवा पाणी जिरवा” याबाबत शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी आयोजित केली होती. “झाडे लावा-झाडे जगवा” “प्रदूषण टाळा-आरोग्य पाळा” पाणी अडवा-पाणी जिरवा”,झाडे लावू -निसर्ग वाचवू”असे नाम फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी गावात फेरी काढून पर्यावरण समतोल व वृक्षारोपण जागृती केली. 

या प्रसंगी आयोजिका निर्मला इन्स्टिट्यूटच्या नॅन्सी रोद्रीग्ज रॉड्रिक्स यांनी प्रदूषण व वृक्षारोपण या विषयावर चित्रकला स्पर्धा घेऊन विजयी स्पर्धकांना

बक्षीस देण्यात आले. छाया बंगाळ, अश्विनी गायके,  लता भगत यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात सहकार्य केले.,केंद्र प्रमुख मनोज गव्हाणे, शिक्षक अशोक दारवंटे, पी,.जी.बोर्डे, विद्या सोनार, सर्वश्री त्रिभवन,  मोगल, पैठणकर, श्रीमती मुजमुळे, भुजबळ, नवले, श्रीमती पठाण, गवारे, पैठणकर, बहालस्कर यांनी सहकार्य केले.