वैजापूर येथील मौलाना आझाद विद्यालयात जेष्ठ नागरिकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

वैजापूर,३१ मार्च /प्रतिनिधी :- येथील पालिकेच्या मौलाना आझाद विद्यालयातील  सर्व शालेय विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते तथा पालिकेचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत व जेष्ठ नागरिक उत्तमराव साळुंके यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जी.जी.राजपूत कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थ्यांना गणवेश मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.श्री राजपूत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेत गणवेश परिधान करून यावे व शिस्त पाळावी असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी शिक्षिका सुनीता वसावे, श्री. राठोड उपस्थित होते.