चोरवाघलगाव येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण

वैजापूर ,२८ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव येथे विविध विकास कामांसाठी 1 कोटी 12 लक्ष 42 हजार रुपयांचा निधी शासनाच्या विविध योजनांतून मंजूर  झाला असून या निधीतून करण्यात येणाऱ्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण रविवारी (ता.28) आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष साबेरभाई व अन्य पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते पार पडले.

कार्यक्रमास ह.भ.प.सुदाम महाराज, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, बाजार समितीचे सभापती रामहरीबापू जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, माजी तालुकाप्रमुख खुशालसिंग राजपूत, भाजप तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे यांची विशेष उपस्थिती होती.

आ.रमेश पाटील बोरणारे,माजी नगराध्यक्ष साबेरभाई यांची यावेळी भाषणे झाली. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. बाजार समितीचे माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख पद्माताई साळुंके, शहरप्रमुख सुप्रियाताई व्यवहारे, शिवसेनेचे शहरप्रमुख पारस घाटे, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, नगरसेवक दशरथ बनकर, प्रशांत कंगले, युवासेना तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड, बाजार समितीचे संचालक कल्याण पाटील जगताप, गोरख आहेर, गणेश इंगळे, प्रशांत त्रिभुवन, प्रविण पवार, रजनीकांत नजन, उपतालुकाप्रमुख डॉ. प्रकाश शेळके, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब झिंजुर्डे, डॉ.बाबासाहेब डांगे, विभागप्रमुख परसराम मोईन, उपविभागप्रमुख सुनील कारभार, युवासेना तालुका समन्वयक गणेश निकोले, धनंजय धोर्डे, सतीश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.