वैजापूर येथे “नेत्रसेवा आपल्या दारी” या डोळे तपासणी शिबिरात 82 रुग्णांची तपासणी

31 रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार

वैजापूर, १५ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-औरंगाबाद -चिकलठाणा लायन्स आय हॉस्पिटलव भगवान महावीर रुग्णालय नगर परिषद वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता.14) भगवान महावीर रुग्णालयात “नेत्र सेवा आपल्या दारी” अंतर्गत डोळे तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 82 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी 31 रुग्णांची मोती बिंदू औरंगाबाद येथे मोफत होणार आहे असे प्रकल्प समन्वयक विनोद हरकुटे यांनी सांगितले. 

सदर नेत्र तपासणी शिबीर आता यापुढे दर सोमवारी सकाळी साडेदहा ते दुपारी दोनपर्यंत दर आठवड्याला राहणार आहे. या शिबिराचे उदघाटन नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान,  मुख्याधिकारी भागवत बिघोत व नगरसेवकांच्या उपस्थितीत झाले. सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता निकाळे, सहाय्यक अशोक गाडेकर, परिचारिका सहाय्यक संगीता सिरसाट, चेतन निखाडे, गणेश निकम, लखन गाडेकर यांनी शिबीर यशस्वीतेसाठी सहकार्य केले. नेत्र तपासणीक उत्कर्षा वैद्य, अक्षय ढाकरे, सविता शेजवळ यांनी रुग्णांची तपासणी केली.