विरगाव सोसायटीच्या निवडणुकीत शिंदे – भाजप युतीचे 5 उमेदवार बिनविरोध

वैजापूर, १५ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील विरगांव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत  शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युतीचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले.

जनार्धन परदेशी, काशिनाथ परदेशी, दिलीप त्रिभुवन, मथुरा संभाजी थोरात, गंगुबाई चिमनराव कदम अशी  बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांची नावे आहेत.  बिनविरोध निवड व्हावी यासाठी मा. नगराध्यक्ष साबेर खान, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील जगताप, बाजार समितीचे संचालक कल्याण जगताप, संजय पाटील बोरणारे यांनी प्रयत्न केले. 

बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी नानासाहेब थोरात, काशिनाथ बारसे, विलास थोरात, बापूसाहेब डहाके, बाळासाहेब परदेशी, कारभारी जाधव, विलास कदम, संभाजी थोरात, संदीप थोरात, राम बारसे, प्रमोद बारसे, विनायक थोरात यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते..