औरंगाबाद जिल्ह्यात 1 हजार 224 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद,२३ जानेवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 567 जणांना (मनपा 454, ग्रामीण 113) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 49 हजार 972 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1 हजार 224 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 61 हजार 401 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 675 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण सात हजार 754 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (779) घाटी परिसर 4, खडकेश्वर 1, क्रांती चौक 4, बन्सीलाल नगर 2, उस्मानपुरा 1, कांचनवाडी 6, बीड बायपास 3, नागेश्वरवाडी 1, गुरूदत्त नगर 1, सातारा परिसर 2, प्रताप नगर 2, पैठण रोड 1, पद्मपुरा 1, अजब नगर 1, जालन नगर 3, सैनिक विहार 1, पेठे नगर 3, एसटी कॉलनी 1, देवगिरी कॉलेज परिसर 1, उस्मानपुरा 2, इटखेडा 1, गारखेडा 5, समर्थ नगर 1, विजय नगर 1, राम नगर 1, मिल कॉर्नर 1, रेल्वे स्टेशन परिसर 1, आदर्श नगर 1, उस्मानपुरा 1, संजय नगर 1, नागेश्वरवाडी 1, जय टॉवर 2, एन वन सिडको 1, रामतारा हा. सो. 1, नूतन कॉलनी 3, पडेगाव 2, कासलीवाल मार्वल 1, शेंद्रा 1, हमालवाडा 1, ज्योती नगर 2, रेल्वे स्टेशन 1, पद्मपुरा 1, शांतीनिकेतन कॉलनी 2, सातारा परिसर 1, राजा बाजार 1, सुपारी हनुमान मंदिर परिसर 1, एन सहा सिडको 1, गजानन कॉलनी 1, देशमुख नगर 3, गोकुळ अपार्टमेंट 1, सहकार नगर 1, बजाज नगर 1, सूतगिरणी, गारखेडा परिसर 1, रोशन गेट 1, नक्षत्रवाडी 1, हिमायत नगर 3, एमआयडीसी परिसर 2, हनुमान नगर 1, छावणी 1, गजानन कॉलनी 1, भीम नगर 1, पैठण गेट 1, रिलायन्स डिजिटल प्राझोन मॉल परिसर 1, दिशा अपार्टमेंट 1, मिलिनियम पार्क 1, टिळक नगर 1, संसार नगर 1, बायजीपुरा 1, शिवाजी नगर 2, अन्य 673

ग्रामीण (445)औरंगाबाद 141, फुलंब्री 12, गंगापूर 36, कन्नड 19, खुलताबाद 32, सिल्लोड 65, वैजापूर 78, पैठण 48, सोयगाव 14

मृत्यू (02)

घाटी (02) 1.85 पुरूष, शेकटा, औरंगाबाद2.62, पुरूष, भवन, सिल्लोड