विरगाव येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार ; दोघांना अटक

वैजापूर,​७​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातीलअल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दिंगबर प्रकाश थोरात (रा.विरगाव) व केतन दादाराव ऋषी (रा.वडोदबाजार) अशी या घटनेतील आरोपींची नावे आहेत.
विरगाव येथील तेरा वर्षीय मुलीचे 23 ऑगस्ट रोजी रात्री अपहरण झाल्याची तक्रार तिच्या वडीलांनी विरगाव पोलिस ठाण्यात दिली होती.त्यावरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता रांजणगाव ता नेवासा येथून सदर अल्पवयीन मुलीस व आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सदर मुलीस नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. लग्नाचे आमिष दाखवून गावातीलच दिंगबर थोरात याने मुलीस पळवून नेले होते. मुलीस पळवून नेण्यासाठी थोरात याला त्याचा मित्र केतन ऋषी याने मदत केली तसेच तिला ऋषी याच्या नात्यातील एका जणांकडे रांजणगाव येथे राहण्याची सोय करण्यात आली.तेथे सदर अल्पवयीन मुलीवर एक सप्टेंबर पर्यंत वारंवार अत्याचार केले. या प्रकरणी थोरात व ऋषी या दोघांविरुद्ध विरगाव पोलिस  ठाण्यात बलात्कार, अपहरण व अन्य कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.