वैजापूर येथे वीरभद्र यात्रा महोत्सव उत्साहात

वैजापूर ,९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वैजापूर शहराचे आराध्य दैवत विरभद्र महाराज यांची सालाबादप्रमाणे भरणारी यात्रा याहीवर्षी मोठ्या आनंद व उत्साहात मंगळवारी झाली.

शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या या विरभद्र मंदिरापर्यंत मंदिराचे भक्त रोहिदास भगत यांनी कमरेला हुक लावून बारा बैलगाड्या ओढत नेल्या, डफच्या तालावर या गाड्या ओढल्या तसेच वीरभद्र महाराज छडी मिरवणूक, यात्रा व महाप्रसाद तसेच रात्री फड असे कार्यक्रम या निमित्ताने भक्तांनी आयोजित केले होते.

या यात्रा उत्सवात भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, शिवसेना तालुका प्रमुख सचिन वाणी,;शहराध्यक्ष राजेंद्र पाटील साळुंके, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, नगरसेवक स्वप्नील जेजुरकर, शैलेश चव्हाण,गणेश खैरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य दिगंबर खंडागळे, रामकीसन जोरे, सोन्याबापू गावडे, बाबुराव गावडे यांची उपस्थिती होती.आयोजक गोरख गावडे, रवी गावडे, दत्तू गावडे, सचिन खंडागळे, रामनाथ गावडे, जगन्नाथ गावडे, भीका गावडे, दत्तू गावडे, बापू साळुंके यांनी यात्रेसाठी परिश्रम घेतले.